Chattisgarh Naxalite Fake Currency: नक्षलवाद्यांचा कारनामा, बनावट नोटांची छपाई; पोलीस कारवाईत मशीन, प्रिंटरसह इतर वस्तू जप्त (Watch Video)

छत्तीसगड पोलिसांनी मोठी कारवाई करत सुकमामध्ये नक्षलवाद्यांकडून बनावट नोटा छापण्याचे मशीन जप्त केले आहे.

Photo Credit - X

Chattisgarh Naxalite Fake Currency: नक्षलवादी आता केवळ दहशत पसरवण्यावर लक्ष केंद्रित करत नाहीत, तर देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचाही प्रयत्न करत आहेत. छत्तीसगड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सुकमामध्ये पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून बनावट नोटा( Fake Currency) छापण्याचे मशीन जप्त केले आहे. पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून मशीन, प्रिंटर, शाई आणि इतर साहित्य जप्त केले आहे. यासोबतच 50, 100, 200 आणि 500 ​​रुपयांच्या बनावट नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत.

सुकमा जिल्हा फोर्स, डीआरजी, बस्तर फायटर आणि सीआरपीएफच्या 50 व्या बटालियनसाठी हे मोठे यश आहे. सुकमा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 'नक्षलवाद्यांना आता पैशांची कमतरता भासू लागली आहे आणि त्यामुळे त्यांनी बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली आहे. पोलीस पथकाने कोरजगुडाच्या जंगलातून प्रिंटर, लोडेड बंदूक, वायरलेस सेट आणि मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जप्त केले आहे.

व्हिडिओ पहा:

या संपूर्ण घटनेची माहिती देताना सुकमा पोलिसांनी सांगितले की, त्यांना नक्षलवाद्यांकडून बनावट नोटा छापण्याची आणि प्रसारित करण्याची माहिती मिळाली होती. यावर सुकमा पोलीस सतर्क झाले. जिल्हा फोर्स, डीआरजी बस्तर फायटर आणि 50 बटालियन सीआरपीएफचे पथक मैलासूर, कोराजगुडा, दंतेशपुरम आणि आसपासच्या गावात शोध मोहीमेसाठी रवाना झाले. यावेळी कोरजगुडा गावाच्या जंगलात सुरक्षा दलाला पाहून नक्षलवादी घटनास्थळावरून पळून गेले. यानंतर घटनास्थळावरून या सर्व बाबी पोलिसांनी गोळा केल्या.