Center's Action on Indian Cough Syrup: भारतीय कफ सिरपवर केंद्राची कारवाई, सरकारी लॅबमध्ये चाचणी केल्यानंतरच होणार निर्यात; 1 जूनपासून नवीन नियम लागू

यानंतरच कफ सिरप निर्यात करण्यास परवानगी दिली जाईल. कप सिरपसाठी नवीन प्रणाली 1 जूनपासून लागू केली जाणार आहे.

Cough Syrup (PC- Pixabay)

Center's Action on Indian Cough Syrup: भारतीय कफ सिरप (Indian Cough Syrup) वर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांनंतर आता सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. परदेशी व्यापार महासंचालनालयाने (DGFT) सोमवारी याबाबत अधिसूचना जारी केली आहे. चौकशी आणि पुराव्याशिवाय कफ सिरपची निर्यात करता येणार नाही, असे अधिसूचनेत म्हटले आहे. अधिसूचनेनुसार, निर्यात करायच्या उत्पादनाच्या नमुन्याची सरकारी प्रयोगशाळेत चाचणी केली जाईल. यानंतरच कफ सिरप निर्यात करण्यास परवानगी दिली जाईल. कप सिरपसाठी नवीन प्रणाली 1 जूनपासून लागू केली जाणार आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने गेल्या वर्षी भारतात चार कप आणि कोल्ड सिरप संदर्भात अलर्ट जारी केला होता. हे कफ सिरप प्यायल्याने गांबियामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. डब्ल्यूएचओने सांगितले होते की, यामुळे किडनीला मोठे नुकसान होते. त्याच वेळी, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने या कफ सिरपची तपासणी सुरू केली होती. (हेही वाचा - Tihar Inmate Commits Suicide: तिहारमध्ये कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या; एक दिवसापूर्वीचं आला होता तुरुंगात)

याशिवाय उझबेकिस्तानने भारतीय कफ सिरपबाबतही प्रश्न उपस्थित केले होते. उझबेकिस्तानने आरोप केला होता की, सिरप प्यायल्याने सुमारे 18 मुलांचा मृत्यू झाला होता.