Tihar Inmate Commits Suicide: तिहारमध्ये कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या; एक दिवसापूर्वीचं आला होता तुरुंगात
तिहारमध्ये जावेद नावाच्या कैद्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. दरोडा आणि इतर गुन्हेगारी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या जावेदने सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली.
Tihar Inmate Commits Suicide: तिहारमध्ये जावेद नावाच्या कैद्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. दरोडा आणि इतर गुन्हेगारी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या जावेदने सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. सध्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी न्यायदंडाधिकारी आणि पोलिस तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आंबेडकर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल केल्याप्रकरणी कैद्याला कारागृह क्रमांक 8/9 मध्ये ठेवण्यात आले होते. जावेदला सोमवारी शिक्षा सुनावण्यात आली होती. (हेही वाचा - Rahul Gandhi Travelling In Truck: राहुल गांधी यांनी दिल्लीहून चंदीगडपर्यंत ट्रकने केला प्रवास, वाहनचालकांच्या समस्या घेतल्या जाणून)
An inmate allegedly died by suicide by hanging himself at Tihar Jail in Delhi. Details awaited.
— ANI (@ANI) May 23, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 23, 2023 12:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

