Watch Video: 4 वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या शस्त्रधारी गुंडांनी आईच्या हिंमतीसमोर टेकले गुडघे; संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मात्र, तिच्या आईने गुंडांशी सामना करत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे अपहरणकर्त्यांचा डाव फसला आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

एका 4 वर्षीय मुलीचे अपहरण करतानाचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, तिच्या आईने गुंडांशी सामना करत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे अपहरणकर्त्यांचा डाव फसला आहे. ही घटना दिल्ली (Delhi) येथील शकरपूर (Shakarpur) परिसरात मंगळवारी घडली आहे. दरम्यान, संबंधित महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजारच्यांनी अपहरणकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण ते पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यावेळी अपहरणकर्त्यांच्या हातात शस्त्र दिसून आले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन भावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून देवाण-घेवाणीवरून वाद सुरू असल्याने मुलीच्या काकानेच दोन जणांना सुपारी देऊन अपहरणाचा कट रचल्याचे समोर आले आहे.

दोन भावांमध्ये देवाण-घेवाणीवरून वाद सुरू होता. त्यामुळे आरोपीने भावाच्या मुलीच्या अपहरणाचा कट रचला. त्यासाठी दोन गुंडांना त्याने सुपारी दिली होती. त्यानुसार दोन्ही गुंड मुलीच्या घराबाहेर आले आणि त्यांनी महिलेकडे पाणी मागितले. त्याचवेळी महिलेचे लक्ष दुसरीकडे असल्याची संधी साधून त्यांनी मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी आईने गुंडाना पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच मदतीसाठी तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. महिलेचा आवाज ऐकल्यानंतर शेजाऱ्यांनी गुंडांना पडकण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे गुंडांनी तेथून पळ काढला. शस्त्रधारी गुंडांसोबत लढून आपल्या मुलीची त्यांच्या तावडीतून सुटका करणाऱ्या महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे देखील वाचा- मुंबई: डोंबिवलीकर घरबसल्या करत आहेत लोकल ट्रेन प्रवासाचा सराव; व्हिडिओ पाहून तुम्हालाही आठवतील जुने दिवस (Video)

ट्विट-

दरम्यान, शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने गुंडाना पळून जाताना पाहिले. त्यावेळी गुंडांना पकडण्यासाठी त्याने भररस्त्यात दुचाकी आडवी घालून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका गुंडाने पिस्तूल दाखवून तेथून पळ काढल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सध्या प्रकरणाची पोलीस अधिक चौकशी करत आहेत.