BJP Candidate Sarvesh Kumar Death: मोरादाबाद येथे मतदान झाल्यानंतर उमेदवार कुंवर सर्वेश सिंह यांचं निधन, दीर्घ आजाराशी झुंज अपयशी

उमेदवारांचे अनेक बातम्या समोर येत आहे.त्यात भाजपचे उमेदवार कुंवर सर्वेश सिंह यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

Kunwar Sarvesh Singh Death PC TWITTER

BJP Candidate Sarvesh Kumar Death: देशात ठिकठिकाणी मतदान सुरु झालं. उमेदवारांचे अनेक बातम्या समोर येत आहे.त्यात भाजपचे उमेदवार कुंवर सर्वेश सिंह यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर भाजप पक्षात शोक पसरला आहे. ते उत्तर प्रदेशातील मोरादाबाद लोकसभा मतदरासंघातील उमेदवार होते. धक्कादायक म्हणजे, मोरबादच्या जागेत मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे निधन झालं आहे. 2014 ते 2019 पर्यंत ते मुरादाबादचे लोकसभेचे खासदार होते. दिल्लीतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंवर सर्वेश सिंह हे गेल्या काही दिवसांपासून आजारापासून त्रस्त्र होते.आजारामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांना वाचवण्यात यश आले नाही. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भाजपकडून मिळाल्यापासून ते रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.

कुंवर  सर्वेश सिंह यांच्या निधनाची माहिती कळताच, राजकिय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. उमेदवाराचा मृत्यू झाल्यानंतर निवडणूक पुन्हा होणार का अशी चर्चा नागरिकामध्ये पसरली आहे. मुरादाबाद लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी झालं. येथे सुमारे ६० टक्के मतदान झाले आणि  निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच सर्वेश कुमारचा मृत्यू झाला. सर्वेश सिंह यांनी पहिल्यांदा १९९१ मध्ये भाजपच्या तिकिटावर ठाकूरद्वारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते सलग चार वेळा आमदार राहिले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif