Modi Surname Defamation Case: राहुल गांधी 2024 ची निवडणूक लढवू शकतील की तुरुंगात जातील? गुजरात हायकोर्टाच्या निर्णयानंतर काँग्रेस नेत्याकडे काय पर्याय असतील? जाणून घ्या
मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाने दोषी ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी राहुल यांनी केली होती. सत्र न्यायालयानेही राहुल गांधी यांचे अपील फेटाळून लावले आहे.
Modi Surname Defamation Case: मोदी आडनावाच्या वादात अडकलेले काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. मानहानीच्या प्रकरणात गुजरात हायकोर्टाने (Gujarat High Court) राहुल गांधींना दणका दिला आहे. सुरत न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत राहुल यांनी उच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाने दोषी ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी राहुल यांनी केली होती.
राहुल गांधी तुरुंगात जाणार का?
हायकोर्टातून याचिका फेटाळल्यानंतर राहुल गांधींवर तुरुंगात जाण्याची टांगती तलवार आहे. राहुल गांधी यांना सीजेएम न्यायालयाने 23 मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षेसोबतच न्यायालयाने त्याला सत्र न्यायालयात जाण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली होती. मात्र, सत्र न्यायालयानेही राहुल गांधी यांचे अपील फेटाळून लावले. (हेही वाचा - 'Modi Surname' Remark Defamation Case: Rahul Gandhi यांना दिलासा नाहीच; शिक्षा माफीचा अर्ज Gujarat High Court नेही फेटाळला)
राहुल गांधींकडे आता कोणते पर्याय?
मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना कोणताही दिलासा मिळालेला नाही. उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने आता त्यांना सर्वोच्च न्यायालयात जावे लागणार आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही काँग्रेस नेत्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्याकडे उच्च न्यायालयाच्या उच्च खंडपीठात दाद मागण्याचा पर्याय अजूनही आहे.
राहुल 2024 ची निवडणूक लढवू शकतील का?
राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. उच्च न्यायालयाकडून राहुल यांना दिलासा मिळाला असता, तर त्यांचे लोकसभा सदस्यत्व बहाल करता आले असते, परंतु आता पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक लढवणे त्यांच्यासाठी कठीण जाणार आहे.
काय आहे नेमकी प्रकरण?
राहुल गांधींवर मोदी आडनावाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटकातील कोलार येथे एका सभेत राहुल गांधींनी मोदी आडनावावरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राहुल म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? राहुल यांच्या वक्तव्याबाबत भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी सुरत न्यायालयात खटला दाखल केला आहे.