Trinamul Agent Caught Red-Handed: मतदान केंद्रावर प्रचार, तृणमुलच्या एजंटला पकडलं रंगेहात, खासदरा लॉकेट चॅटर्जी यांचा गंभीर आरोप

लोकसभा निवडणूकी २०२४ च्या पाचव्या टप्प्यात मतदान केंद्रावर प्रचार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडला आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या हुगळी मतदारसंघात घडली आहे.

MP Locket Chatterjee serious allegations PC ANI

Trinamul Agent Caught Red-Handed: लोकसभा निवडणूकी 2024 च्या पाचव्या टप्प्यात मतदान केंद्रावर प्रचार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडला आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या हुगळी मतदारसंघात घडली आहे.  हुगळीतील त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार रचना बॅनर्जी यांना मत करण्यास सांगणाऱ्या एजंटला रंगेहात पकडल्याचा आरोप भाजपचे खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी केला आहे. या घटनेनंतर मतदान केंद्रावर गोंधळ उडाला होता. (हेही वाचा- लोकसभा निवडणूकीच्या 5व्या टप्प्यात, सकाळी 9 वाजेपर्यंत महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान;

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, टीएमसी उमेदवार रचान बॅनर्जी यांचा प्रचार करत होती. भाजप खासदार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बुथ एजंटला पैसे देऊन 'आशा' कर्मचाऱ्यांना बुथवर बसवले होते. त्यांना बूथवर रचना बॅनर्जी यांच्या प्रचाराचे आदेश देण्यात आले होते. ती महिला तृणमूल एजंट आहे. जी बूथवर लोकांना टीएमसीच्या बाजूने मतदान करण्यास सांगत होती.

लॉकेट चॅटर्जी यांनी सांगितले की, आरोपी महिलेकडे इतर कोणत्याही पक्षाचे पत्रक उपलब्ध नव्हते. महिलेला रंगेहात पकडल्यावर तिच्याकडे कोणत्याही प्रश्नांची उत्तरे नव्हती. तीने सागिंतले की, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते त्यावरून हे काम करते. या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आले होते, पोलिसांना टीएमसी बूथ एजंटबद्दल विचारले असता तेव्हा तीने सांगितले की ती लोकांना रांगेत उभे राहण्यास मदत करत आहे.लॉकेट चॅटर्जी म्हणाले की, आम्ही हुगळीच्या धनियाखली येथील बूथ क्रमांक ११७ बाबत निवडणूक आयोगाला या घटनेची माहिती कळवू. 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement