Magadh Express Accident: बिहारमध्ये मगध एक्सप्रेसचे कपलिंग तुटल्याने रेल्वेचा अपघात; कोणतीही दुर्घटना नाही (Watch Video)
मगध एक्स्प्रेस डुमराव स्टेशनवरून सकाळी 10.58 वाजता निघाली. तुडीगंज स्टेशनजवळ नुआनव गुमतीत पोहोचताच. S-7 कंपार्टमेंटचे कपलिंग तुटले आणि काही डबे वेगळे झाले.
Magadh Express Accident: बिहारच्या बक्सर(Buxar) मध्ये रेल्वे अपघात झाला आहे. कपलिंग तुटल्याने मगध एक्स्प्रेसचे (Magadh Express) दोन भाग झाले. अर्ध्या बोगी पुढे आल्या तर अर्ध्या बोगी काही अंतर दूर राहील्या दानापूर-बक्सर मुख्य मार्गावरील तुडीगंज स्थानकाजवळ ही घटना घडली. सकाळी 11.01 च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. 20802 डाउन मगध एक्स्प्रेस डुमराव स्थानकातून सकाळी 10.58 वाजता निघाली. तुडीगंज स्टेशनजवळ नुआनव गुमतीला पोहोचताच. एस-7 कंपार्टमेंटचे कपलिंग तुटले आणि एक्सप्रेसपासून वेगळे झाले. (हेही वाचा: Train Accident in Bihar: बिहारच्या समस्तीपूरमध्ये टळला मोठा रेल्वे अपघात, संपर्क क्रांती एक्स्प्रेसच इंजिन झालं डब्यांपासून वेगळं)
मगध एक्सप्रेसचे कपलिंग तुटल्याने रेल्वेचा अपघात
एसी असलेला एस-7 डबा पुढे निघाला. उर्वरित डबे रुळावर थांबले. दरम्यान, रेल्वेमॅनच्या लक्षात येताच त्याने गाडी थांबवली. या अपघातानंतर डाऊन मेन लाइनवरील कामकाज ठप्प झाले आहे. या अपघातात एकही प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त नाही. रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. एक्सप्रेसचे डब्बे जोडण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)