Karnatak Bus Accident: उड्डाणपूलावर लटकलेली बस भीषण अपघातातून वाचली, सहा जण जखमी
नेलमंगलाजवळ राष्ट्रिय महामार्गालगतच्या उड्डाणपुलावर बस दुभाजकला आदळली होती.
Karnatak Bus Accident: बेंगळुरुमध्ये शनिवारी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नेलमंगलाजवळ राष्ट्रिय महामार्गालगतच्या उड्डाणपुलावर बस दुभाजकला आदळली होती. या अपघातात KSRTC बसचा कंडक्टर आणि चालकासह सहा जण जखमी झाले. विशेष म्हणजे या भीषण अपघातातून प्रवाशांचे जीव वाचले आहे. बस उड्डाणपुलावरून खाली पडता पडता वाचली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा-घाटकोपरनंतर आता पुण्यात होर्डिंग कोसळले, अनेक गाड्यांचे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारपेटेहून बेंगळुरुला जाणारी केएसआटीसी बस मदननायकनहल्ली येथील उड्डाणपुलावरील डिव्हाडरला धडकली. या धडकेत बस उड्डाणपुलावरून लोंबकळत राहिली. धडक इतकी भीषण होती की, बसचा समोरचा भाग चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. बस सुरक्षितपणे रस्त्यावर आणण्यासाठी पोलिसांनी क्रेनचा वापर केला. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती.
बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आहे. या अपघातात इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे आणि आठ जण जखमी झाले आहेत. बस भीषण अपघातातून वाचली. बसमधील जखमी प्रवाशांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर रस्त्यावर खळबळ उडाली होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अपघातानंतर बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपासणी सुरु केली आहे. चालकाचे अल्कोहोल चाचणी करण्यात येणार आहे. हा अपघात कशा झाला हे अद्याप समोर आले नाही. बस अनियंत्रित झाल्याने डिव्हाडरला धडकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तांत्रिक पथक बसची चाचणी करणार आहे.