Delhi Coaching Centre Tragedy: UPSC उमेदवारांच्या मृत्यूनंतर राजेंद्र नगरमधील बेकायदा बांधकामांवर MCD कडून बुलडोझर कारवाई; संबंधित अधिकारी निलंबित
या दुर्घटनेनंतर दिल्ली महानगरपालिकेचे आयुक्त अश्वनी कुमार यांनी स्थानिक JE आणि AE ला निलंबित केले आहे. दुर्घटनेनंतर अधिकाऱ्यांवर महापालिकेची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. जुन्या राजिंदर नगर घटनेत दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे.
Delhi Coaching Centre Tragedy: दिल्लीच्या आयएएस कोचिंग सेंटर (Delhi Coaching Centre) मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर दिल्ली महापालिकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एमसीडी कोचिंग सेंटरच्या बाहेर बुलडोझर चालवत (Bulldozer Action by MCD) आहे. ड्रेनेज सिस्टीम झाकून संस्थेच्या बाहेर उभारण्यात आलेला फूटपाथ बुलडोझरने पाडण्यात येत आहे. तसेच येथील अतिक्रमणावर कारवाई करण्यात येत आहे. घटनास्थळी स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. या दुर्घटनेनंतर दिल्ली महानगरपालिकेचे आयुक्त अश्वनी कुमार यांनी स्थानिक JE आणि AE ला निलंबित केले आहे. दुर्घटनेनंतर अधिकाऱ्यांवर महापालिकेची ही पहिलीच मोठी कारवाई आहे. जुन्या राजिंदर नगर घटनेत दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. यापूर्वी दोन जणांना अटक करण्यात आली होती. तथापी आता दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी आणखी पाच जणांना अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, घटनास्थळी पोहोचलेल्या जेसीबीने झाकलेल्या नाल्याचा स्लॅब काढण्यात येत आहे. घटनास्थळी तीन जेसीबी उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. राव कोचिंग सेंटरसमोरील नाल्यातून अतिक्रमण काढण्यात येत आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी आणखी पाच आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इमारतीच्या चार मालकांचा समावेश आहे. सरबजीत सिंग, तेजिंदर सिंग, हरविंदर सिंग आणि परविंदर सिंग असे या चार मालकांची नावे आहेत. चौघेही चुलत भाऊ आहेत. हे लोक करोलबागमध्ये राहतात. त्यांनी राव आयएएस कोचिंग सेंटरचे मालक अभिषेक गुप्ता यांना इमारतीचे तळघर 4 लाख रुपये मासिक भाड्यावर दिला होते. (हेही वाचा -Delhi IAS Coaching Center Tragedy: दिल्ली अभ्यासिकेत पाणी घुसल्याने तिघांचा मृत्यू झाल्यानंतर IAS कोचिंग सेंटरचा मालक आणि समन्वयक ताब्यात)
पहा व्हिडिओ -
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना डीसीपी सेंट्रल एम हर्षवर्धन यांनी पुष्टी केली की, या प्रकरणात आणखी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची एकूण संख्या सात झाली आहे. अटक केलेल्यांमध्ये तळघर मालक आणि इमारतीच्या गेटचे नुकसान करून वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचा समावेश आहे. डीसीपी एम हर्षवर्धन यांनी एएनआयला सांगितले की, या घटनेत जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही. आम्ही या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करत आहोत आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था राखत आहोत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)