Madhya Pradesh Shocker: 'बसपा'चे नेते महेंद्र गुप्ता यांची गोळी झाडून हत्या, आरोपी फरार, पोलिसांची कारावाई सुरु
मध्य प्रदेशातील लोकसभा निवडणूकी पूर्वी बहुजन समाज पक्षाच्या नेत्याची सोमवारी रात्री उशिरा राज्याच्या छतरपूर शहरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील लोकसभा निवडणूकी पूर्वी बहुजन समाज पक्षाच्या नेत्याची सोमवारी रात्री उशिरा राज्याच्या छतरपूर शहरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सोमवारी रात्री उशिरा रात्री एका लग्न समारंभात सहाभागी झाले होते. नेते महेंद्र गुप्ता यांच्या डोक्यात गोळी झाडली. आरोपीने हल्ला केल्यानंतर लगेच घटनास्थळावरून फरार झाले. महेंद्र गुप्ता यांनी बिजावर विधानसभा मतदार संघातून बसपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. तरीही त्यांचा पराभव झाल होता. हेही वाचा- जमिनीच्या वादातून VHP समन्वयकावर गोळीबार, AAP नेते अमर अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल, रायगड मध्ये खळबळ
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी एका लग्न समारंभात सहभागी झाल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबारात महेंद्र यांचा डोक्याला गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. आरोपी घटनास्थळावरून फरार असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी शहरात नाकाबंदी लावली आहे. मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. महेंद्र गुप्ता हे बसपाचे सर्वात ताकदवान नेत्यांपैकी एक होते.
पोलिसांनी शहरात नाकाबंदी लावली आहे. बड्या नेत्यांची हत्या झाल्याने छतरपूर येथीस एसीपी खुद या गुन्हाचा तपासात गुंतले आहे. आरोपींना लवकरात लवकर पडण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. महेंद्र गुप्ता यांची हत्या झाल्याची माहिती पसरताच राजिकय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)