BSNL 5G Service: Jio, Airtel, VI चे टेन्शन वाढणार! BSNL लवकरच सुरु करणार 5G सेवा

BSNL ही सध्या एकमेव टेलिकॉम कंपनी आहे जिने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या नाहीत. गेल्या महिन्यात, Jio, Airtel, VI ने त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. तेव्हापासून मोठ्या संख्येने वापरकर्ते बीएसएनएलकडे वळले आहेत. एकीकडे BSNL कमी किमतीत रिचार्ज प्लॅन देत असताना दुसरीकडे आपल्या यूजर्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी आणली आहे.

BSNL 5G Service

BSNL 5G Service: BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) ने आपल्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. BSNL ही सध्या एकमेव टेलिकॉम कंपनी आहे जिने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या नाहीत. गेल्या महिन्यात, Jio, Airtel, VI ने त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. तेव्हापासून मोठ्या संख्येने वापरकर्ते बीएसएनएलकडे वळले आहेत. एकीकडे BSNL कमी किमतीत रिचार्ज प्लॅन देत असताना दुसरीकडे आपल्या यूजर्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी आणली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, BSNL लवकरच आपली 5G सेवा सुरू करणार आहे. मात्र, ही सेवा देशातील काही शहरांमध्येच सुरू होणार आहे. BSNL च्या या मोठ्या झेपनंतर खाजगी टेलिकॉम कंपन्यांना नक्कीच मोठा झटका बसणार आहे, पण युजर्ससाठी ही खूप चांगली बातमी आहे. BSNL वापरकर्ते आता कमी किमतीत चांगल्या सेवेचा आनंद घेऊ शकणार आहेत. हे देखील वाचा: Transgenders Arrested by Navi Mumbai Police: सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करणाऱ्या 21 ट्रान्सजेंडर्सना नवी मुंबई पोलिसांकडून अटक

BSNL 5G चाचणी सुरू करणार 

BSNL लवकरच 5G चाचणी योजना सुरू करू शकते. सध्या BSNL कडे Jio, Airtel आणि Vi च्या तुलनेत स्वस्त रिचार्ज प्लॅन आहेत, पण सरकारी कंपनी 5G नेटवर्कच्या तुलनेत Jio आणि Airtel च्या मागे होती, पण आता BSNL सुद्धा 5G सेवा आणणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, BSNL आपले 5G नेटवर्क वेगाने स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर बीएसएनएल वापरकर्त्यांना कमी किमतीत कॉलिंग सेवा तसेच स्वस्त दरात हाय स्पीड डेटा मिळेल. अहवालानुसार, बीएसएनएलची ही चाचणी एक ते तीन महिन्यांत सुरू होऊ शकते. BSNL आपल्या 5G नेटवर्कची पहिली चाचणी दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, गुरुग्राम सारख्या मोठ्या शहरांमध्ये करू शकते.