Independence Day 2022: स्वातंत्र्य दिनानिमित्त सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तान रेंजर्समध्ये अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर मिठाईची देवाणघेवाण, पहा फोटो

दरम्यान, स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) सीमा सुरक्षा दल (BSF) आणि पाकिस्तान रेंजर्सने (Pakistan Rangers) अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर (Attari-Wagah border) मिठाईची देवाणघेवाण केली.

BSF And Pakistan Rangers (PC - ANI)

देश आज स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे. ठिकठिकाणी देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) सीमा सुरक्षा दल (BSF) आणि पाकिस्तान रेंजर्सने (Pakistan Rangers) अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर (Attari-Wagah border) मिठाईची देवाणघेवाण केली. मिठाईची देवाणघेवाण करताना वातावरण अगदी प्रसन्न झाले होते. सीमा सुरक्षा दलाच्या बाजूने कमांडंट जसबीर सिंग (Jasbir Singh) यांनी नेतृत्व केले. बीएसएफ आझादीचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे.

यादरम्यान बीएसएफ कमांडंट जसबीर सिंग म्हणाले, सीमा सुरक्षा दल स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. गेल्या एका महिन्यात बीएसएफने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या शाळा, महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांनी कार्यक्रमात सहभाग घेतला आणि रंगीत सादरीकरणे देऊन सैनिकांना प्रोत्साहन दिले.

मिठाईची देवाणघेवाण करताना बीएसएफ आणि पाकिस्तान रेंजर्सच्या जवानांनीही एकमेकांशी हस्तांदोलन केले.स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तिरंगा झेंडे फडकवले जात आहेत. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, कार्यालये, उद्याने, चौक आदी ठिकाणी तिरंगा फडकावून लोक स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत आहेत.