Delhi-Pune SpiceJet Flight Bomb Threat: दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची सूचना; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
यानंतरसीआयएसएफ आणि दिल्ली पोलिस अलर्टवर आहेत.
Delhi-Pune SpiceJet Flight Bomb Threat: विमानात बॉम्ब (Bomb) असल्याची माहिती मिळाल्याने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Delhi IGI Airport) एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती आहे. ही माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तपास करत आहेत.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, उड्डाण करण्यापूर्वी स्पाईसजेटच्या दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. यानंतरसीआयएसएफ आणि दिल्ली पोलिस अलर्टवर आहेत. दिल्ली विमानतळावर विमानाची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. परंतु SOP नुसार सुरक्षा नियमांचे पालन केले जात आहे. या सूचनेनंतर निमलष्करी दल CISF आणि दिल्ली पोलीस सज्ज आहेत. (हेही वाचा -Retail Inflation Rate: सर्वसामान्यांना दिलासा! डिसेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर 5.72 टक्क्यांवर)
याआधी सोमवार, 9 जानेवारीला विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. गुजरातच्या जामनगर विमानतळावर मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या 'अझूर एअर'च्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मात्र, झडतीनंतर विमानात काहीही संशयास्पद आढळले नाही, त्यानंतर मंगळवारी दुपारी हे विमान गुजरातहून गोव्यात पोहोचले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की विमानात बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर एनएसजी आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी शोध घेतला, ज्यामध्ये काहीही संशयास्पद सापडले नाही. या विमानात 236 प्रवासी आणि आठ क्रू मेंबर्स होते.