Bihar: खळबळजनक! बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील महादेव घाट परिसरात मृतदेहांचा खच, जिल्हा प्रशासनाने दिली 'अशी' माहिती
भारतात आलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. या लाटेत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असूनही मृतांचाही आकडेवारी चिंताजनक आहे. दरम्यान, स्मशानभूमीत दिवसरात्र चिता पेटत असल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. यातच बिहारच्या (Bihar) बक्सरमधील (Buxar) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चौसातील (Chausa) महादेव घाट (Mahadev Ghat) परिसरात कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचा खच पडल्याचे कळत आहे. परंतु, हे सर्व प्रेत उत्तर प्रदेशमधून वाहत आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
चौसाचे बीडीओ अशोक कुमार यांनी सांगितले की, हे सर्व प्रेत मोठ्या संख्येत वेगवेगळ्या ठिकाणाहून वाहून महदेव घाटावर आले आहेत. हे प्रेत बिहारमधील नाहीत. आम्ही एक पहारेकरी ठेवला आहे, ज्याच्या देखरेखीखाली लोकांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. महत्वाचे म्हणजे, उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या या प्रेतांना रोखण्याचा कोणताही मार्ग नाही. आम्ही या प्रतांच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा-Gujarat: कोरोनामुळे पतीचा मृ्त्यू; पत्नीसह दोन मुलांनी विषप्राशन करुन संपवले जीवन
ट्वीट-
कोरोना रुग्णांचे मृतदेह घाट परिसरात येत आहेत. जर भटक्या कुत्र्यांनी हे मृतदेह खाल्ल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो,अशी भिती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.