अयोध्येत भाजपा नेते जय प्रकाश सिंह यांची गोळी घालून हत्या

अशातचं अयोध्यमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अयोध्यामध्ये आज पलिया प्रताप शाह गावात ग्राम प्रधान जय प्रकाश सिंह आणि राम पदारथ यादव उर्फ नन्हा यादव यांच्यामध्ये वाद झाला. या वादात दोघांनीही एकमेकांना गोळी घातली. यात जय प्रकाश सिंह आणि राम पदारथ यादव या दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन (Lockdown) पाळण्यात येत आहे. अशातचं अयोध्यमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अयोध्यामध्ये आज पलिया प्रताप शाह गावात ग्राम प्रधान जय प्रकाश सिंह (Bjp Leader Jai Prakash Singh) आणि राम पदारथ यादव उर्फ नन्हा यादव यांच्यामध्ये वाद झाला. या वादात दोघांनीही एकमेकांना गोळी घातली. यात जय प्रकाश सिंह आणि राम पदारथ यादव या दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मृत जयप्रकाश सिंह हे भाजप खासदार लल्लू सिंह यांच्या जवळचे होते. या घटनेची माहिती मिळताच लल्लू सिंहही घटनास्थळी दाखल झाले. लॉकडाऊन काळात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे पलिया प्रताप शाह गावात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा - Coronavirus Update: भारतात तुमच्या राज्यात किती आहेत कोरोना रुग्ण, जाणून घ्या राज्यनिहाय आकडेवारी)

दरम्यान, या घटनेनंतर जखमी जयप्रकाश सिंह यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. दोन दिवसांपूर्वी अयोध्येत महराजगंज भागात मंशाराम यादव यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह मातीमध्ये लपवून ठेवला होता. अयोध्येत एकाच आठवड्यामध्ये गोळीबाराच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यामुळे याठिकाणच्या पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif