Begusarai Crime: पैसे न दिल्याने जन्मदात्या आईची हत्या, आरोपी मुलाला अटक
पैसे देण्यास नाकारल्याने जन्मदात्या आईची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आईच्या डोक्यात वीटेने मारून तीची हत्या केली.
Begusarai Crime: बिहार येथील पाटाण परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पैसे देण्यास नाकारल्याने जन्मदात्या आईची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आईच्या डोक्यात वीटेने मारून तीची हत्या केली. आरोपी मुलावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी 21 जून रोजी घडली आहे.मृत महिलेचे नाव नुतन देवी आहे. (हेही वाचा- रिक्षाच्या धडकेत 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल)
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी आरोपीने आईच्या डोक्यात विटाने मारून हत्या केली. आरोपी पंचबा गावातील रहिवासी आहे. आनंद कुमार अशी आरोपीची ओळख झाली आहे. आनंदने रागाच्या भरात आईचा गळा दाबला. पीडित महिलेला वाचवण्याासाठी आरोपीचे काका आणि भाऊ धावत गेले. परंतु आरोपीने त्यांना आतल्या खोलीला बंद केले.
आईचा गळा दाबून तीला अंगणात आणले त्यानंतर त्याच्यावर विटाने मारहाण केली. या घटनेनंतर पीडित महिलेने आरडाओरड सुरु केली. जब्बर मारहाणीत आईचा मृत्यू झाला. आनंद घटनास्थळावरून फरार झाला. शेजारच्यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.
प्राथमिक तपासातून असे दिसून आले की, पीडित महिला कमवती होती आणि आरोपी बेरोजगार होता. त्यामुळे नेहमी आईकडून पैसे घेऊन जात असे. दोन दिवसांपासून आरोपीने आईकडून पैसे मागितले होते परंतु आईने पैसे देण्यास नकार दिला होता. याचा त्याला राग आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फरार असल्याल्या आरोपीला पोलिसांनी अटक केले आहे.