Tamil Nadu Accident: रस्ता ओलांडत असताना दुचाकीस्वाराची धडक, न्यायाधीसाचा मृत्यू, घटना CCTV कैद

पोल्ल्याची रस्ता ओलांडत असताना दुचाकीने धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

hit and run case pC TW

Tamil Nadu Accident: तामिळनाडू येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. पोल्ल्याची रस्ता ओलांडत असताना दुचाकीने धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघातात मृत झालेले इसम हे निलगिरी जिल्हा न्यायाधीस होते. न्यायाधीसाच्या अपघाती मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात मंगळवारी झाला. (हेही वाचा-  सोशल मिडिया इंफ्लुएंसर Aanvi Kamdar चा मृत्यू; रायगडमधील धबधब्यावर इंस्टाग्राम रीलचे शूटिंग करत असताना पडली दरीत)

मिळालेल्या माहितीनुसार, रस्ता ओलांडत असताना समोरून भरधाव वेगात एक दुचाकी आली आणि रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातामुळे रस्ता ओलाडणांरा काही फूट अंतरावर उडाले. हा अपघात परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला. अपघातानंतर जिल्हा न्यायाधीस घटनास्थळी जखमी अवस्थेत पडून राहिले. त्यांच्या मदतीसाठी स्थानिकांनी धाव घेतली. जखमी व्यक्तीची मदत करण्याऐवजी दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला.

त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पंरतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती तात्काळ माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी अपघातस्थळी जावून सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या बाईकच्या नंबर प्लेटवरून त्याला अटक करण्यात आले. कांजमपट्टी येथून आरोपी वंजीमुथूला अटक केले. अशी माहिती पोलिसांनी दिली.