Bihar Election Results 2020 Abp News Live Streaming: एबीपी न्यूजवर पाहा बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल

या निवडणुकीचा निकाल आज म्हणजेचं 10 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. भारतीय निवडणूक आयोगा (Election Commission of India) सकाळी आठ वाजल्यापासून बिहार निवडणुकीसंदर्भात अपडेट देत राहील. याव्यतिरिक्त तुम्ही विविध वाहिन्यावरही बिहार निवडणुकीचा निकाल पाहू शकता. आपण एबीपी न्यूज या निवडणुकीच्या निकालांचे लाईव्ह कव्हरेज पाहू शकतात.

Bihar Election Results 2020 (Photo Credit - File Photo)

Bihar Election Results 2020 Abp News Live Streaming: बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Election 2020) साठी 3 टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीचा निकाल आज म्हणजेचं 10 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून 243 जागांवरील 3,755 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी राज्यातील 38 जिल्ह्यात 55 मतमोजणी केंद्र उभारण्यात आली आहेत. विविध संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत. या एक्झिट पोलनुसार, बिहारच्या जनतेने राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनकडे सत्ता सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. मात्र, असं असलं तरी बिहार निवडणूकीत भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये तब्बल 12 प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यामुळे बिहारच्या जनतेने पुढील पाच वर्ष कोणत्या पक्षाला आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

भारतीय निवडणूक आयोगा (Election Commission of India) सकाळी आठ वाजल्यापासून बिहार निवडणुकीसंदर्भात अपडेट देत राहील. याव्यतिरिक्त तुम्ही विविध वाहिन्यावरही बिहार निवडणुकीचा निकाल पाहू शकता. आपण एबीपी न्यूज या निवडणुकीच्या निकालांचे लाईव्ह कव्हरेज पाहू शकतात. यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

येथे पहा निकाल - 

दरम्यान, बिहारमध्ये 28 ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानात 55.69 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली होती. यात 16 जिल्ह्यातील 71 मतदारसंघांचा समावेश होता. तसेच 3 नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 55.70 टक्के मतदान झालं होतं. या टप्प्यात 17 जिल्ह्यातील 94 मतदारसंघांचा समावेश होता. याशिवाय अंतिम आणि शेवटच्या टप्प्यात 7 नोव्हेंबर ला सायंकाळी 6 वाजेपर्यंत 54.57 टक्के मतदान झालं. शेवटच्या टप्प्यात 15 जिल्ह्यातील 78 मतदारसंघांत मतदान पार पडलं.