IPL Auction 2025 Live

Bihar Election Results 2020 Aaj Tak Live Streaming: आजतक वर पाहा बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लाईव्ह

यासाठी निवडणूक आयोगाने 55 मतमोजणी केंद्रे स्थापन केली असून तेथे सीएपीएफच्या कंपन्या आणि सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले आहेत.

Bihar Assembly Elections 2020 | (Photo Credits: File Image)

बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election Results 2020) मतमोजणीला आज (10 नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. यासाठी निवडणूक आयोगाने 55 मतमोजणी केंद्रे स्थापन केली असून तेथे सीएपीएफच्या कंपन्या आणि सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले आहेत. दरम्यान, बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा एनडीएची सरकार स्थापन होणार की तेजस्वी यादव महागठबंधनला सत्ता मिळवून देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदानोत्तर कलचाचण्यांचे अंदाज बिहारमध्ये सत्तांतराची चाहूल देत आहेत. 15 वर्षांच्या एकछत्री कारभारानंतर होणाऱ्या संभाव्य बदलाची उत्सुकता वाढते आहे. हा बदल महाआघाडीच्या रूपात असेल की भाजपच्या वाढत्या वर्चस्वात असेल? याचे चित्र आज निकालातून स्पष्ट होईल.

कोरोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक ठरली आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. या निवडणूकीत कोणता पक्ष बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. हे देखील वाचा- Exit Poll Results of Bihar Assembly Elections 2020: बिहार निवडणूक निकालात CNN News18-Today's Chanakya च्या अंदाजानुसार महागठबंधन 180 तर NDA 55 जागा जिंकणार

आजतक लाईव्ह-

बिहारमध्ये एकूण 243 विधानसभा जागा आहेत. 243 जागांसाठी 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती. त्या वेळी राजद-जदयू या पक्षांच्या महागठबंधनला 178 जागा मिळाल्या होत्या. राजदला 80, जनता दल युनायटेडला 71 आणि काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. तर उर्वरीत 58 जागा भाजप प्रणित एनडीएच्या वाट्याला आल्या होत्या. आता विधानसभा निवडणूक 2020 मध्ये जनता काय कौल देते याबाबत उत्सुकता आहे.