Bihar Shocking: क्रिकेट सामन्यात 'रन आऊट'वरून पेटला वाद, मैदानातच एकाची हत्या
ज्यामुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू (Murder) झाला आहे. ही घटना बिहारच्या (Bihar) भागलपूर (Bhagalpur) जिल्ह्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (Engineering College) आवारात घडली आहे.
क्रिकेट (Cricket) दरम्यान पेटलेल्या वादात मध्यस्ती करणाऱ्या एका व्यक्तीला खेळाडूंनी जबर मारहाण केली. ज्यामुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू (Murder) झाला आहे. ही घटना बिहारच्या (Bihar) भागलपूर (Bhagalpur) जिल्ह्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (Engineering College) आवारात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद मंडल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रल्हाद यांचा मुलगा नुकूल मंडल क्रिकेट खेळत होता. सामनादरम्यान नुकूलला रन आऊट दिल्याने नुकूलच्या भावाने सुरज कुमार नावाच्या तरूणाच्या कानशिलात लगावली. ज्यामुळे त्यांच्यात मैदानातच वाद पेटला. त्यावेळी प्रल्हाद यांनी मध्यस्ती करत त्यांच्यातील वाद मिटवला. त्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू आपपल्या घरी निघून गेले. परंतु, सुरज त्याचे मित्र अमर, अजय, दिपक आणि इतर लोकांसह पुन्हा मैदानाजवळ आला. त्यानंतर सुरजने आपल्या मित्रांसह नुकूल आणि त्याच्या भावाला मारहाण करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान मध्यस्ती करण्यासाठी आलेल्या प्रल्हाद यांच्यावरही त्यांनी क्रिकेट बॅट, लाकडी दांडक्याने प्रहार केला. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. हे देखील वाचा- Uttar Pradesh Shocking: भावाच्या डोक्यात घातला सिलिंडर, पुतण्यालाही केले ठार; उत्तर प्रदेशच्या 19 वर्षीय तरूणाचे धक्कादायक कृत्य
अधिकाऱ्याने पुढे म्हटले आहे की, मृत प्रल्हाद यांचे इंजिनिअरिंग महाविद्यालयच्या परिसरात चायची टपरी आहे. सामन्यादरम्यान झालेल्या वादानंतर हे प्रल्हाद यांचे दोन्ही मुले तिथेच थांबले होते. तसेच सूरज आणि इतर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.