Bihar Crime News: हुंड्यासाठी महिलेला जिवंत जाळले, पतीसह दोघांवर गुन्हा दाखल; बिहार येथील घटना

महिलेला जाळण्यात आले होते या घटनेत तीन भाजली होती. त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

Bihar Crime News: बिहारमधील भोजपूर गावात एकाने आपल्या पत्नीचा हुंड्यासाठी बळी घेतला आहे. महिलेला जाळण्यात आले होते या घटनेत तीन भाजली होती. त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना संभल टोला गावातील आहे. महिलेच्या वडिलांनी तिच्या पतीसह सासरच्या मंडळीवर आरोप केला आहे, पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्यावर हुंडाबळीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे. सर्व आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली आहे.

मृत महिलेच्या वडिलांनी तक्रारीनुसार, संदिप कुमार असं आरोपीचं नाव आहे. त्यांच तीन वर्षांपूवी लग्न झाल होते. लग्नाच्या वेळी सासरकडून क्षमतेपेक्षा जास्त हुंडा मागितला होता. त्यानंतर त्याना हुंडा म्हणून दुचाकीची मागणी केली होती परंतु ते दुचाकी देणं शक्य झालं नाही. त्यानंतर या मागणीमुळे पीडित महिलेला सासर कडून रोज मारहाण होत होती. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, शनिवारी सकाळी ८ वाजता त्यांच्या मुलीने फोन केला होता. पतीने पुन्हा भांडण केल्याची माहिती फोनवर दिली होती. त्याच सायंकाळी पीडित महिला जळण्याच्या बातमी कळाली.

वडिलांनी रुग्णालयात धाव घेतला. डॉक्टरांनी त्यांना पाटणा येथील रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले परंतु महिलेच्या पतीने तीला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पंरतु डॉक्टरांनी तिला तिथे मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. या घटनेनंतर वडिलांनी संपुर्ण घटना पोलिसांना सांगितली. आरोपी फरार असल्याने त्यांचा शोध सुरु आहे.