Bihar Assembly Elections 2020: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीचे जागावाटप निश्चित; राष्ट्रीय जनता दल 144 तर, काँग्रेस 70 जागेवर लढणार
या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाच्या वाटेला 144 जागा आल्या आहेत. यांपैकी काही जागा जेएमएन आणि व्हीआयपीला देण्यात येणार आहे. तर, कॉंग्रेस पक्ष 70 जागेवर निवडणूक लढवणार आहेत.
बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Elections 2020) साठी महाआघाडीचे जागावाटप निश्चित झाले आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) वाटेला 144 जागा आल्या आहेत. यांपैकी काही जागा जेएमएन आणि व्हीआयपीला देण्यात येणार आहे. तर, कॉंग्रेस (Congress) पक्ष 70 जागेवर निवडणूक लढवणार आहेत. तसेच, डावीआघाडी 29 मतदारसंघातून लढणार असल्याचे ठरले आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते अविनाश पटदे यांनी म्हटले की, काही मतभेद दूर झाल्यानंतर आरजेडी, काँग्रेस, व्हीआयपी आणि लेफ्ट यांची महाआघाडी झाली आहे. 2015 मध्ये महाआघाडीला जनतेचे समर्थन मिळाले होते. पण त्या बहुमताचे अपहरण झाले. नीतीश कुमार यांना दगा दिला आणि भाजपसोबत सत्तेत गेले. जनता त्यांना माफ करणार नाही. महाआघाडीचे नेतृत्व तेजस्वी यादव करणार आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Bihar Dalit Teenage Girl Gang Rape: धक्कादायक! बिहारमधील गया येथे किशोरवयीन दलित मुलीची सामूहिक बलात्कारानंतर गळफास घेऊन आत्महत्या
एएनआयचे ट्विट-
बिहारमध्ये एकूण 3 टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबरला होणार असून त्यानंतर 3 नोव्हेंबर आणि मग 7 नोव्हेंबरला शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत 243 पैकी महाआघाडीला 178 जागा मिळाल्या होत्या. नीतीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री बनले होते. पण 2 वर्षानंतर जेडीयू महाआघाडीमधून बाहेर पडली. भाजप सोबत सत्ता स्थापन केली.