ISI Mark Mandatory For Stainless Steel Vessels: सरकारचा मोठा निर्णय! स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी ISI मार्क अनिवार्य

ग्राहक सुरक्षा आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एखाद्या कंपनीने या नियमांचे पालन केले नाही तर संबंधित कंपनीला दंड आकारण्यात येणार आहे.

ISI Mark Mandatory For Stainless Steel Vessels: सरकारचा मोठा निर्णय! स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी ISI मार्क अनिवार्य
Stainless Steel Vessels प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

ISI Mark Mandatory For Stainless Steel Vessels: केंद्र सरकारने स्टेनलेस स्टील (Stainless Steel) आणि ॲल्युमिनियम (Aluminium) च्या भांड्यांसंदर्भात (Vessels मोठा निर्णय घेतला आहे. आता स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यासाठी भारतीय मानक ब्युरो (Bureau of Indian Standards) च्या निकषांचे पालन करणे केंद्र सरकारने अनिवार्य करण्यात आले आहे. स्वयंपाकघरातील सुरक्षितता, गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (डीपीआयआयटी) द्वारे 14 मार्च 2024 रोजी जारी केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशानुसार अशा भांड्यांसाठी आयएसआय चिन्ह अनिवार्य असेल, असं म्हटलं आहे. ग्राहक सुरक्षा आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एखाद्या कंपनीने या नियमांचे पालन केले नाही तर संबंधित कंपनीला दंड आकारण्यात येणार आहे.

बीएसआयने भारतीय मानक IS 14756:2022 मध्ये या गुणधर्मांचे कोडिफिकेशन केले आहे. त्यात स्वयंपाक, खानपान सेवा, डायनिंग आणि स्टोरेजमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या भांड्यांसाठीच्या आवश्यक मानकांचा समावेश आहे. ही मानक पुढीलप्रमाणे आहेत: (हेही वाचा - Zomato Relaunches Intercity Legends Service: झोमॅटोने पुन्हा सुरू केली 'इंटरसिटी लीजेंड्स' सेवा; आता ग्राहकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात खाद्यपदार्थ ऑर्डर करता येणार)

• साहित्य आवश्यकता: उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या सामग्रीची सुरक्षित रचना .

आकार आणि परिमाणे: भांड्यांच्या डिझाइनमध्ये एकसमानता असावी. व्यावहारिक दृष्टीकोन असावा.

भांड्यांची कलाकुसर आणि भांड्यांवर शेवटचा हात फिरवणे: उच्च-गुणवत्तेची कारागिरी करून भांड्यांना आकर्षक करणे.

• वापरण्यापूर्वीच्या चाचण्या:

स्टेनिंग टेस्ट, मेकॅनिकल शॉक टेस्ट, थर्मल शॉक टेस्ट, ड्राय हीट टेस्ट, कोटिंग जाडी टेस्ट, क्षमता टेस्ट, फ्लेम स्टॅबिलिटी टेस्ट आणि टेम्पर्ड ग्लास लिड्स असलेल्या भांडीसाठी विशिष्ट चाचण्या घेण्यात याव्यात.

ॲल्युमिनियमची भांडी: हलकी आणि कार्यक्षम

बीएसआयने भारतीय मानके 1660:2024 विकसित केली आहेत. हार्ड एनोडाइज्ड आणि नॉन-स्टिक अनरिइन्फोर्स्ड प्लास्टिक कोटिंगसह 30 लीटर क्षमतेपर्यंतच्या कास्ट ॲल्युमिनियम भांड्यांसाठीच्या आवश्यक निकषांचे तपशील त्यात आहेत.

1660:2024 मानकांचे मुख्य घटक:

• सामान्य आवश्यकता: वापरलेल्या सामग्रीची एकूण गुणवत्ता आणि जाडी

• वर्गीकरण आणि सामग्रीची श्रेणी: तयार केलेल्या भांडीसाठी IS 21 आणि कास्ट भांडीसाठी IS 617 नुसार योग्य ग्रेडचा वापर करणे.

• फॅब्रिकेशन आणि डिझाइन: उच्च-गुणवत्तेच्या भांड्यांसाठी आवश्यक आकार, परिमाण आणि कलाकुसरीचे तपशील.

• वापरण्यापूर्वीच्या चाचण्या: टिकाऊपणा आणि सुरक्षिततेच्या हमीसाठी ॲल्युमिनियम लंच बॉक्सच्या विशिष्ट चाचण्यांचा समावेश आहे.

14 मार्च 2024 च्या गुणवत्ता नियंत्रण आदेशानुसार स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांप्रमाणेच ॲल्युमिनियमची भांड्यांनाही आयएसआय प्रमाणपत्र अनिवार्य आहे. बीएसआय मानकांची पूर्तता न करणारी कोणतीही व्यक्ती भांड्यांचे उत्पादन, आयात, विक्री, वितरण, साठवणूक करू शकत नाही, तसेच भांडी भाड्याने देऊ शकत नाही किंवा ती प्रदर्शनात ठेवू शकत नाही. या आदेशाचे उल्लंघन करणे हा दंडनीय अपराध आहे. सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि किचनवेअर उत्पादनांच्या दर्जाविषयीच्या हमीसाठी मानकांचे पालन करणे आवश्यक आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



Share Us