Nuh Violence: नुह हिंसाचार प्रकरणी प्रशासनाची मोठी कारवाई, 365 जणांना अटक, 153 FIR दाखल; गृहमंत्र्यांनी जाहीर केला अहवाल

त्यामुळे गेल्या दोन दिवसांत सातत्याने नवीन एफआयआर नोंदवण्यात येत आहेत.

Nuh Violence (PC - Twitter)

Nuh Violence: नुह हिंसाचार प्रकरणी (Nuh Violence Case) प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मेवातच्या नूह (Nuh) येथे 31 जुलै रोजी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 153 गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी 11 नवीन एफआयआर नोंदवले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईचा स्टेटस रिपोर्ट जारी करताना हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी गुरुवारी सांगितले की, पोलिस तपासादरम्यान अनेक नवीन तथ्ये समोर येत आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत सातत्याने नवीन एफआयआर नोंदवण्यात येत आहेत.

भारतीय दंड संहितेच्या कलम 153-A, 295A, 505(2) अंतर्गत आतापर्यंत 10 जिल्ह्यांमध्ये एकूण 34 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी त्यांची संख्या 29 होती, त्याअंतर्गत पोलिसांनी नऊ नवीन लोकांना अटक केली आहे. याशिवाय अन्य कलमांतर्गत 119 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी या प्रकरणांची संख्या 113 होती. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 356 जणांना अटक करण्यात आली आहे. अनिल विज यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 153 गुन्हे दाखल करण्यात आले असून 365 जणांना अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा -Haryana Violence: पाकिस्तानशी लिंक असलेल्या सोशल मीडिया गटांनी आक्रमक कारवाईला केले प्रवृत्त; पोलिसांकडून चौकशी सुरु)

जिल्ह्यातील परिस्थिती सुरळीत करण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. गुरुवारी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल केल्याचा परिणामही संपूर्ण जिल्ह्यात दिसून आला. निम्म्याहून अधिक दुकाने उघडी दिसली. सरकारी बसेस व्यतिरिक्त खाजगी बस आणि ऑटो आणि टॅक्सी देखील धावू लागल्या आहेत.

तथापी, जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांपासून ते बाजारपेठा आणि शहरे आणि गावांपर्यंत विविध ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आरएएफसह निमलष्करी दले तैनात आहेत. परिणामी हिंसाचाराचा आरोप करणाऱ्यांच्या गावांमध्ये आणि वसाहतींमध्ये कायद्याचा धाक निर्माण होऊ लागला आहे.