Bhopal Shocker: भोपाळमधील फ्लॅटमध्ये पाच वर्षांच्या मुलीचा सापडला मृतदेह, बलात्कारकरून हत्येचा संशय, तिघांना अटक

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी एक व्यक्ती, त्याची आई आणि बहिणीला अटक करण्यात आली आहे.

Rape Representational Image (File Photo)

Bhopal Shocker: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गुरुवारी एका बहुमजली इमारतीतील घरात मृतावस्थेत सापडलेल्या पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी एक व्यक्ती, त्याची आई आणि बहिणीला अटक करण्यात आली आहे. हे देखील वाचा:Pune Shocker: कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोन अल्पवयीन मुलांसह आरोपी पोलिसांच्या ताब्यात

भोपाळचे पोलीस आयुक्त एचसी मिश्रा यांनी संध्याकाळी उशिरा पीटीआयला सांगितले की, पोस्टमार्टमच्या संक्षिप्त अहवालानुसार, तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.