Bhopal Shocker: धक्कादायक! IPS शालिनी दीक्षित यांच्या मुलीचा नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू, चौकशी सुरु

भोपाळच्या अतिरिक्त उपायुक्त (झोन-3) शालिनी दीक्षित यांची मुलगी मैथवी दीक्षित हिचा नवव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

DCP Shalini Dixit's Daughter death

Bhopal Shocker: मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळ येथे मोठी दुर्घटना घडली आहे. भोपाळच्या अतिरिक्त उपायुक्त (झोन-3) शालिनी दीक्षित यांची मुलगी मैथवी दीक्षित हिचा नवव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री भोपाळ शहरात आराधना नगर भागात ही घटना घडली. दिवाळी निमित्त ती आजीच्या घरी आली तेव्हा ही घटना घडली. ती नवव्या मजल्यावरून कशी पडली हे पोलिसांनी अद्यपही स्पष्ट केले नाही. या घटनेनंतर परिसरात मोठी शांतता पसरली आहे.

या प्रकरणी कमला नगर पोलिस ठाण्यात चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय मुलीचे नाव मैथवी दीक्षित असून ती भोपाळच्या अतिरिक्त डीसीपी (झोन-3) शालिनी दीक्षित यांची मुलगी आहे.तिचे वडील संदीप दीक्षित भोपाळ वाहतूक पोलिसांचे माजी अतिरिक्त डीसीपी होते. गुरुवारी रात्री मैथवी आराधना नगर परिसरातील रिव्हिएरा हाईट्स येथील तिच्या घरी आजीला भेटण्यासाठी गेली होती. ती इमारतीच्या नवव्या मजल्यावर असलेल्या घराच्या बाल्कनीतून पडली आणि तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच तिच्या पालकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कॉलनीतील रहिवाशांनी तिला रुग्णालयात दाखल केले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. मुलगी बाल्कनीतून कशी पडली याचा तपास सुरू असल्याचे एसएचओ शर्मा यांनी सांगितले. मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement