Bhagavad Gita: आता शाळांमध्ये शिकवली जाणार 'भगवत गीता'; 'या' राज्यातील सरकारने केली घोषणा

पुढील शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना गीता शिकवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Bhagavad Gita (PC - pixahive)

Bhagavad Gita: गुजरात सरकार (Gujarat Govt) ने शिक्षण क्षेत्रात मोठे पाऊल उचलले आहे. आता गुजरात (Gujarat) मधील शाळांमध्ये पुढील सत्रापासून भगवद्गीता (Bhagavad Gita) शिकवली जाणार आहे. गीता जयंतीनिमित्त राज्याचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया (Gujarat Education Minister Praful Pansheriya) यांनी ही घोषणा केली आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना गीता शिकवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत त्याची अंमलबजावणी होत असल्याचे पानशेरिया यांनी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांना समृद्ध, वैविध्यपूर्ण ज्ञान प्रणाली आणि भारताच्या प्राचीन संस्कृतीशी जोडणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

राज्याचे शिक्षणमंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी सांगितलं की, भगवद्गीता वाचून विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल. त्यांचा दृष्टीकोन बदलेल. विद्यार्थ्यांना विश्व आणि पर्यावरणाविषयी भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणी जाणून घेता येतील. इयत्ता आठवी ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांचे लोकार्पण करताना पानशेरिया म्हणाले की, लहान वयात मिळालेले शिक्षण आयुष्यभर लक्षात राहते. राष्ट्रपिता महात्मा गांधी तरुण असताना त्यांनी एकदा राजा हरिश्चंद्राचे नाटक पाहिले होते. या नाटकाचा त्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला. त्यांनी सत्याचा अवलंब करून त्याला आपले शस्त्र बनवले. (हेही वाचा - MPSC Estimated Schedule for 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर, घ्या जाणून)

पानशेरिया यांनी पुढे बोलताना सांगितलं की, सनातन हिंदू धर्माचा सर्वात मोठा धर्मग्रंथ 'श्रीमद भागवत गीता' असून हे आपल्या संपूर्ण जीवनाचे सार आहे. ज्यामध्ये अध्यात्म, व्यवस्थापन, नेतृत्व, सर्जनशीलता, मूल्ये आणि उत्कृष्टतेचे शहाणपण हे उत्तम समाज घडवण्याची अनोखी शस्त्रे आहेत. भगवद्गीतेची शिकवण आजही प्रासंगिक आहे.

प्रफुल्ल पानशेरिया यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली, गुजरात सरकारने इयत्ता 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना भगवद्गीता शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अभ्यासक्रम तयार करून आज लाँच करण्यात आला आहे.