Bengaluru Shocker: बहिणीच्या लग्नाची चिंता; गांजा विकूण पैसे कमावण्याची भावाची शक्कल, पहिल्या विक्री आधीच 5.2 किलो ड्रग्जसह अटक

ज्यात आरोपीने आपल्या बहिणीच्या लग्नासाठी पैसे उभे करण्यासाठी ड्रग्स विकण्याचे काम केले असल्याची कबूली दिली.

Marriage (PC - Pixabay)

Bengaluru Shocker: बहिणीचे लग्न मोठ्या थाटात करण्याची प्रत्येक भावाची इच्छा असते. त्यासाठी भाऊ भरपूर मेहनत करून पैशांची जुळवाजूळव करतो. लग्नात कोणतीच गोष्ट कमी पडू नये याची काळजी घेतो. मात्र, बेंगळूरुत एका भावाने त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी लवकर पैसे कमवावेत म्हणून थेट गांजा विक्रीचे(Ganja Sell)पाऊल उचलले. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्याकडे असलेल्या गांजाची पहिली विक्री होण्याआधीच त्याला पोलिसांनी (Ganja Selling News)पकडले. बदरुद्दीन असे आरोपीचे नाव असून तो मूळचा दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूरचा रहिवासी आहे. (हेही वाचा: Nagpur RPF Railway: विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेसमध्ये ट्रॉली बॅगमध्ये 13 किलो गांजा सापडला)

बेंगळुरू पोलिसांनी गांजा विक्रीतील एका 25 वर्षीय तरुणाला मुकतीच अटक केली आहे. ज्यात आरोपीने आपल्या बहिणीच्या लग्नासाठी पैसे उभे करण्यासाठी ड्रग्स विकण्याचे काम केले असल्याची कबूली दिली. 2 सप्टेंबर रोजी पोलिसांनी बदरुद्दीन याला पूर्व बंगळुरूमधील एसएमव्हीटी रेल्वे स्थानकावरून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून 5.2 किलो गांजा जप्त केला आहे.  (हेही वाचा: Chennai Drug Raid: छापेमारीत पकडल्या गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या, पोलिसांनी अर्धा किलो गांजा केला होता जप्त)

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 2 सप्टेंबर रोजी बद्रुद्दीन अंमली पदार्थाची पहिली खेप विकण्यासाठी एसएमव्हीटी रेल्वे स्थानकावर आला होता. मात्र, त्या आधीच पोलिसांनी अटक केली. तपासादरम्यान, आरोपी बद्रुद्दीनने कबूल केले की तयाने ओडिशातील अंमली पदार्थ तस्करांकडून गांजा आणला होता. तो गांजा बेंगळुरूत ग्राहकांना विकणार होता.

तपासादरम्यान, पोलिसांना अघडकीस आले की, बद्रुद्दीन शहरातील एका हॉटेलमध्ये काम करत होता. त्याची आर्थिक परिसिथीती हालाखीची आहे. कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले. आपल्या बहिणीच्या लग्नासाठी पैसे जमवण्याचा प्रयत्न तो करत होता. लवकर पैसे कमवण्यासाठी त्याने गांजाची विक्री केली.