Bengaluru Crime: चार वर्षाच्या मुलाच्या हत्ये प्रकरणी सीईओ सुचना सेठ यांना अटक, मृतदेह बॅगेत ठेवून केला गोव्याहून प्रवास; कर्नाटक पोलिसांची कारवाई

एका कंपनीच्या सीईओ असलेल्या सुचना सेठ यांनी आपल्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Suchana seth PC Twitter/ pixabay

Bengaluru Crime: एका कंपनीच्या सीईओ असलेल्या सुचना सेठ (CEO Suchana Seth) यांनी आपल्या चार वर्षाच्या मुलाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोव्यातील कॅंडोलीम येथील सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये आपल्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केली. या प्रकरणात गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. धक्कादायक म्हणजे मुलाची हत्या केल्यानंतर सुचना आपल्या मुलाचा मृतदेह एका बॅगेत घेऊन टॅक्सीतून बेंगळुरूला निघाली. सध्या सुचना ह्यांना कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील आयमंगला पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅंडोलिम येथील हॉटेल सोल बनियन येथील सर्व्हिस अपार्टमेंटमधील रुम क्रमांक ४०४ सुचना आपल्या मुलासोबत होत्या. शनिवारी  हॉटेल चेक आऊट केल्यानंतर कर्मचारी खोली साफ करण्यासाठी गेले असताना ही घटना उघडकीस आली. एका कर्मचाऱ्याला खोलीत रक्ताचे डाग दिसले आणि त्यांनी लगेच हॉटेल व्यवस्थापनाला सूचना दिली. सकाळी अकराच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. (हेही वाचा-  बेपत्ता जैन धर्मगुरूची कर्नाटकात हत्या, पोलिसांकडून मृतदेहाचा शोध सुरू)

आरोपी महिलेने हॉटेल कर्मचाऱ्यांना कर्नाटकच्या बेंगळुरुसाठी कॅब बुक करण्यास सांगितले. हॉटेल कर्मचाऱ्यांनी महिलेला कॅबने जाण्याऐवजी फ्लाईटने जाण्याची विनंती केली. पण तीने नकार दिला आणि कॅब बुक करण्यास सांगितले. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला. हॉटेल मधून बाहेर पडताना मुले  तिच्यासोबत नव्हते. पोलिसांनी कॅब ड्रायव्हरला फोन करून या प्रकरणी माहिती दिली. पोलिसांनी तिला तिच्या मुलाबद्दल चौकशी केली,ज्यावर तिने तीने उत्तर दिले की तो, मैत्रिणीकडे गेला असल्याची माहिती दिली. पोलिसांनी पत्ता देखील विचारला तो पत्ता खोटा असल्याचे समोर आले.

पोलिसांचा संशय आता वाढत गेला,  पोलिसांनी पुन्हा कॅब ड्रायव्हरला फोन केला आणि महिलेला जवळच्या पोलिस ठाण्यात नेण्यास सांगितले. कॅब चालकाने कॅब चित्रगुडा पोलिस स्टेशनमध्ये नेलं. हत्ये प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केले आणि महिलेची बॅग तपासली, तेव्हा मुलाचा मृतदेह बॅगेत सापडला.चौकशीत मुलाचा मृत्यू कशा आणि का केला याची चौकशी सुरु आहे.या संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही.