Murder News: मुलाच्या सततच्या छळाला कंटाळून वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल, दार्जिलिंगमध्ये खळबळ

सततच्या छळाला कंटाळून वडिलाने मुलाची हत्या केली आहे. दार्जिलिंगमधील या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Murder News: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग मध्ये माटीगारा ब्लॉक येथे आदिवासी समाजातील एका व्यक्तीने मध्यपी मुलाचा खून केला आहे.बिशाल शाबर असं मृताचे नाव आहे. सततच्या छळाला कंटाळून वडिलाने मुलाची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांनी या घटने नंतर आरोपी व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. कुतनू शाबर असं आरोपीचे नाव आहे.  दारू पिऊन रोज घरी येवून आई आणि वडिलांना मारहाण करायचा असं स्थानिकांनी पोलिसांना सांगितले.

मीडिया रिपोर्टनुसार, शहरातील माटिगारा ब्लॉक परिसराती एका आदिवासी समाजात ही घटना घडली आहे. सततच्या छळाला कंटाळून वडिलांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. रोज दारू पिऊन कुटूंबातील सदस्यांना मारहाण करायचा त्यामुळे वडिलांनी सोमवारी भांडण सुरु असताना, धारदार शस्त्राने मुलाच्या अंगावर वार केला. हल्लात तो जखमी गंभीर झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला ताब्यात घेतले. मुलाचा मृतदेह पोस्टर्माटमसाठी पाठवण्यात आला. स्थानिकांच्या म्हणणानुसार मुलगा रोज दारू पिऊन येत असायचा, घरातल्यासोबत नेहमी भांडण करायचा. आई वडिलांना मारहाण देखील करायचा मारहाणीपासून पालकांना वाचवण्यासाठी अनेकदा शेजाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली. शेजाऱ्यांशीही भांडण करत असे. पोलीसांनी आरोपीला कोठडीत ठेवले आहे त्याच्यावर खूनाचा आरोप नोंदवला आहे. [Poll ID="null" title="undefined"]

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement