Lockdown: ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलूनचे दुकाने उघडण्यास परवानगी- केंद्रीय गृहमंत्रालय

येत्या 3 मे रोजी संपणारा लॉकडाऊन आता 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, यादरम्यान काही गोष्टींवर सूटही देण्यात आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा (Lockdown) कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. येत्या 3 मे रोजी संपणारा लॉकडाऊन आता 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, यादरम्यान काही गोष्टींवर सूटही देण्यात आली आहे. येत्या 4 मेपासून सुरु होणाऱ्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या भागात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलून (Barber Shops) उघडण्यास सशर्त परवानगी असेल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने (Union Home Ministry) शनिवारी स्पष्ट केले आहे. दरम्यान, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये परवानगी देण्यात आलेली असली तरीही सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणे बंधनकारक ठरणार आहे. तसेच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सरकारच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे. नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील झोन्सची यादी जाहीर झाली आहे.   त्यानुसार केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स प्रमाणे नियोजन ठरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. लॉकडाउनमध्ये विविध शहरात अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष ट्रेनची सेवा सुरु केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्या ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये असलेल्या सलूनच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. हे देखील वाचा- Amazon & Flipkart च्या सेवा 'या' अटीवर होणार सुरु; जीवनावश्यक वस्तू सोडूनही करता येणार खरेदी

पीटीआयचे ट्वीट-

कोरोना विषाणू बाबतची संपूर्ण देशातील स्थिती पाहता सर्वात जास्त जिल्हे रेड झोन मध्ये उत्तर प्रदेशातील असून तब्बल 19 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसरा नंबर महाराष्ट्राचा लागत असून, तिसरा नंबर तामिळनाडूचा आहे. 3 मे रोजी लॉकडाऊन लागू करून 40 दिवस पूर्ण होणार आहेत. परंतु, कोरोना विषाणूचे संसर्गाचे प्रमाण देशभरात झपाट्याने वाढतच चालले आहे. लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान होत असून लॉकडाऊन शिथिल केल्यास कोरोनाच्या संसर्गाची भीती अशा दुहेरी संकटात देश सापडला आहे.