जगात सर्वात खराब ट्राफिकमध्ये बेंगलोर पहिल्या स्थानी, मुंबईचा 4 था नंबर; जाणून घ्या Top 10 शहरे

महत्वाचे म्हणजे संपूर्ण जगात ट्राफिकच्या बाबतील सर्वात खराब शहर म्हणून बेंगलोरची (Bengaluru) निवड करण्यात आली आहे

Mumbai Monsoon (Photo Credits: Twitter)

तुम्ही एकदा का मुंबईत (Mumbai) राहिलात तर जगात कुठेही राहू शकाल असे म्हटले जाते. मुंबई शहर अनेक गोष्टी शिकवते, त्यातीलच एक म्हणजे सहनशीलता. मुंबईच्या ट्राफिकमध्ये (Traffic) तासंतास अडकण्याच्या सवयीमुळे मुंबईकरांचा पेशंस प्रचंड वाढलेला असतो. मात्र मुंबईमधील ट्राफिकची स्थिती इतकी खराब आहे की, याबाबत मुंबई संपूर्ण जगात 4 थ्या स्थानी आहे. महत्वाचे म्हणजे संपूर्ण जगात ट्राफिकच्या बाबतील सर्वात खराब शहर म्हणून बेंगलोरची (Bengaluru) निवड करण्यात आली आहे. नेदरलँड्स नेव्हिगेशन कंपनी टॉम टॉमच्या वार्षिक रहदारी निर्देशांकात (TomTom Traffic Index) हे उघड झाले आहे.

बेंगलोर शहरात 2019 मध्ये, लोकांनी प्रवासात सुमारे 243 तास व्यतीत केले आहेत. 30 मिनिटांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना 71% अधिक वेळ लागतो. यासोबतच बेंगलोर सोबत मुंबई, पुणे आणि दिल्ली हेही ट्राफिकच्या बाबत जगातील अव्वल देशांमध्ये आहेत. मनिला (फिलिपिन्स), बोगोटा (कोलंबिया), मॉस्को (रशिया), लिमा (पेरू), इस्तंबूल (तुर्की) आणि जकार्ता (इंडोनेशिया) ही शहरे पहिल्या दहामध्ये आहेत. अहवालानुसार लोक दरवर्षी सरासरी 193 तास म्हणजे सुमारे 7 दिवस, 22 तास ट्राफिकमध्ये घालवतात.

या शहरांत आहे सर्वात खराब ट्राफिक –

> बंगळुरु (भारत)

> मनिला (फिलिपिन्स)

> बोगोटा (कोलंबिया)

> मुंबई (भारत)

> पुणे (भारत)

> मॉस्को ओब्लास्ट (रशिया)

> लिमा (पेरू)

> नवी दिल्ली (भारत)

> इस्तंबूल (तुर्की)

> जकार्ता (इंडोनेशिया)

(हेही वाचा: केंद्राकडून महाराष्ट्राला वाहतूकीच्या दंड वसूलीबाबत 'अल्टिमेटम' जारी)

विशेष म्हणजे रहदारीच्या बाबतीत अव्वल असणाऱ्या भारतातील शहरांपैकी, दिल्लीत सर्वाधिक कार आहेत. असे असूनही दिल्ली याबाबतीत 8 व्या स्थानावर आहे. याबाबतच्या अभ्यासानुसार असा निष्कर्ष काढला गेला आहे की, भारतातील मेट्रो शहरांमध्ये दिल्लीतील रस्ता उत्तम आहे. रहदारी निर्देशांकात असे आढळले आहे की, 20 ऑगस्ट, 2019 हा वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात वाईट दिवस होता आणि या दिवशी 103% जास्त ट्राफिक होते. त्याच वेळी, 6 एप्रिल 2020 रोजी 30%  ट्राफिक होते. या दिवशी ट्राफिक सर्वात कमी होते.