अयोध्या जमीन वाद : 4 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्ट करणार सुनावणी
या प्रकरणी 4 जानेवारी रोजी सुनावणी करण्यात येणार आहे.
देशातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला मुद्दा म्हणजे राम जन्मभूमी प्रकरणावर सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी 4 जानेवारी रोजी सुनावणी करण्यात येणार आहे.
यापूर्वी 29 जानेवारी रोजी आयोध्या राम मंदिर- बाबरी मस्जिद जमीनीचा हक्क कोणाचा या वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने सुनावणी करण्याचे टाळले होते. मुख्य न्यायाधीश रंजन गोगई यांच्या नेतृत्वाखालील तीन नवीन न्यायाधीशांनी सुनावणी 2019 पर्यंत ढकलली होती.
तसेच 30 सप्टेंबर 2010 रोजी इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करत सुनावणी करण्यात आली होती. तर कोर्टाने आयोध्या राम मंदिर- बाबरी मस्जिद या विवादित जमीनीची तीन भागात विभागणी करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला होता.