Chennai: ऑटिस्टिक मुलाचा स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू, ट्रेनर आणि मालकावर गुन्हा दाखल

स्विमिंगपूल क्लास सुरु असताना मुलगा पुलमध्ये पाण्यात पोहोत होता त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Chennai: चेन्नई येथील कोलाथूर येथे खासगी स्विमिंगपूलमध्ये (Swimming Pool) एका अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्विमिंगपूलचा क्लास सुरु असताना अल्पवयीन मुलगा ट्रेनरकडून प्रशिक्षण घेत होता. पुलमध्ये पाण्यात पोहोत होता त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी स्विंमिग पूल मालक आणि ट्रेनरवर गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा- खेळताना 4 वर्षीय चिमुकल्याचा Manhole मध्ये पडून मृत्यू, थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, कोलाथूर येथे स्विमिंग शिकत असताना एका अल्पवयीन मुलाने जीव गमावला आहे. ही घटना 4 ऑगस्ट रोजी घडली. तासभर स्विंमिग पूलमध्ये पोहल्यानंतर तो थकला आणि यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याला ट्रेनरनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला. क्रितीक सबरीश्वर असं मृत मुलाचे नाव होते. त्यांच्या कुटुंबानी दिलेल्या माहितीनुसार, क्रितीकला ऑटिझ्म स्पेक्ट्रम डिसऑर्डर होता. क्रितीक ज्या स्विमिंग पूलमध्ये पोहाचयचा तो पूल ३.५ फूट खोलवर होता. मुलाच्या मृत्यूनंतर पालकांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांच्या तक्रारीवरून स्विंमिग पूल मालक आणि ट्रेनरवर गुन्हा दाखल झाला. स्विमिंगपूल सील करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

क्रितीकच्या आईने तक्रारीत म्हटले की, ट्रेनरने त्याला एक तासहून अधिक वेळ पोहायाला सांगितले होते. तो थकल्यानंतर ही ट्रेनरने त्याला बाहेर येण्यास मनाई केली होती. त्यामुळे बुडून त्याचा मृत्यू झाला. पोहताना अचानक खाली बुडून गेला. त्यानंतर त्याला ट्रेनरने बाहेर काढले. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात केले.



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद