IPL Auction 2025 Live

Shraddha Walkar Murder Case: त्याने आमच्या बहिणीचे 35 तुकडे केले, आम्ही त्यांचे 70 तुकडे करू; आफताबला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर हल्ला; Watch Video

दिल्लीतील फॉरेन्सिक सायन्स लॅब (एफएसएल) कार्यालयाबाहेर हल्ला करणाऱ्यांनी ते हिंदू सेनेचे सदस्य असल्याचा दावा केला आहे.

Attack on police van carrying Aftab Poonawalla (PC -Twitter/ ANI)

Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा आफताब प्रकरणात (Shraddha Walkar Murder Case) नवा ट्विस्ट येताना दिसत आहे. खुनी आफताब पूनावाला (Aftab Poonawalla) याला घेऊन जाणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या व्हॅनवर तलवारधारी तरुणाने हल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. श्रद्धा वालकर प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. आफताबने श्रद्धाची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून त्याची विल्हेवाट लावली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी श्रद्धा हत्येचा आरोपी आफताब पूनावाला याला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर तलवारीने सज्ज असलेल्या दोन लोकांनी हल्ला केला. हल्लेखोर स्वतःला हिंदू सेनेचे सदस्य असल्याचे सांगत आहेत.

दिल्लीतील फॉरेन्सिक सायन्स लॅब (एफएसएल) कार्यालयाबाहेर हल्ला करणाऱ्यांनी ते हिंदू सेनेचे सदस्य असल्याचा दावा केला आहे. श्रद्धा हत्येतील आरोपी आफताब पूनावाला याला दिल्लीतील एफएसएल कार्यालयाबाहेर घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर हल्ला करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (हेही वाचा - Shraddha Murder Case: हत्येनंतर काही दिवसांनीचं आफताबने बनवली दुसरी गर्लफ्रेंड; भेट म्हणून दिली श्रद्धाची अंगठी)

एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, दिल्ली पोलिसांची तिसरी बटालियन तुरुंगातून कैद्यांना उचलून आणण्यासाठी जबाबदार आहे. पोलिस व्हॅनमध्ये एक उपनिरीक्षक आणि चार पोलिसांसह पाच पोलिस कर्मचारी उपस्थित होते तेव्हा आफताबला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर दोन व्यक्तींनी तलवारींनी हल्ला केला. पोलिस व्हॅन सुरक्षित आहे.

आफताबची नार्को चाचणी -

श्रद्धा आणि आफताबच्या प्रकरणात पोलिसांनी नार्को टेस्ट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, आफताबने पॉलीग्राफी चाचणीला चकवा दिल्याच्या बातम्या आल्या आहेत. आता नार्को टेस्ट करावी लागणार आहे. आफताबच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याला तिहारमधील सेल क्रमांक 4 मध्ये एकटे ठेवले जाईल असे आणखी एका अहवालातून समोर आले आहे. (हेही वाचा- Delhi Crime: पतीची हत्या करून अवयवाचे केले तुकडे, पत्नीसह मुलगा अटकेत)

समोर आलेल्या बातम्यांमध्ये असे म्हटले जात आहे की, श्रद्धासोबत रिलेशनशिपमध्ये असूनही आफताबचे अनेक मुलींसोबत संबंध होते. आफताबने श्रद्धाकडून हिसकावून दुसऱ्या मुलीला दिलेली अंगठी पोलिसांनी जप्त केली आहे. मुलीची ओळख पटली असून, पोलीस पथक तिचीही चौकशी करणार आहे.