Crime: गावातील भांडण सोडवायला गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला, गावकऱ्यांनी फाडली खाकी

यावेळी गावकऱ्यांनी हेड कॉन्स्टेबलचा गणवेश फाडला आणि अनेक पोलिसांना ओलीस ठेवल्याचे सांगितले जात आहे.

Arrested

एका प्रकरणाचा तपास करण्यासाठी शनिवारी रात्री उशिरा श्रीगंगानगर (Sriganganagar) जिल्ह्यातील अनुपगड तहसील (Anupgad Tehsil) भागातील 91 जीबी गावात पोहोचलेल्या पोलिस पथकाला गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, 91 जीबी गावात एका प्रकरणाची तक्रार केल्यानंतर पोलीस तपासासाठी आले असता गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी गावकऱ्यांनी हेड कॉन्स्टेबलचा गणवेश फाडला आणि अनेक पोलिसांना ओलीस ठेवल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर रात्री उशिरा गावात खळबळ उडाली.  यानंतर घटनेची माहिती मिळताच डीएसपी मोठ्या पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले.

त्यांनी गावकऱ्यांवर बळाचा वापर करून ओलिस झालेल्या पोलिसांची सुटका केली. अनुपगड तहसील परिसरातील 91 जीबी गावात शनिवारी रात्री उशिरा काही लोकांनी एका जमिनीवर कब्जा केला होता, त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये या जमिनीवरून बराच काळ वाद सुरू होता. खरं तर, विजय नगर येथील रहिवासी असलेल्या पवन चुघने शनिवारी रात्री 10 वाजता माहिती दिली की, त्यांच्या गावातील 91 जीबीमधील जमिनीवर सतनाम सिंहने अतिक्रमण केले आहे, त्यानंतर एएसआय पृथ्वी सिंह त्यांच्या टीमसह तेथे पोहोचले. हेही वाचा Nashik Suicide Case: नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या; वडील आणि दोन मुलांनी गळफास लावून संपवली जीवनयात्रा

पोलीस तेथे पोहोचताच अतिक्रमणधारकांनी पोलीस पथकावरच हल्ला करून घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले. त्याचवेळी हल्लेखोरांनी हेड कॉन्स्टेबल महेंद्र सिंग यांचा गणवेशही फाडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक जयदेव सिहाग आणि अनुपगड पोलिस स्टेशनचे अधिकारी फूलचंद शर्मा घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अनुपगड सर्कलमधून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त पाचारण करून प्रकरण शांत केले.

त्याचवेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. पोलिस उपअधीक्षकांनी सांगितले की पोलिसांच्या पथकाने स्टेशन ऑफिसर फूलचंद शर्मा यांना संघर्षाची माहिती दिली, त्यानंतर त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यांचा आढावा घेतल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. यानंतर मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर सर्व हल्लेखोर घरात लपले. त्याचवेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांना बराच वेळ समजावूनही पोलिसांच्या ताब्यात न दिल्याने पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत 5 जणांना ताब्यात घेतले.