Lakhimpur Case: आशिष मिश्राची तुरुंगातून बाहेर, केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाची तब्बल 128 दिवसांनी सुटका
3 ऑक्टोबर रोजी झालेल्या तिकोनिया घटनेत चार शेतकरी, एक पत्रकार, एक चालक आणि दोन भाजप कार्यकर्ते ठार झाले होते. एका पत्रकाराच्या मृत्यूप्रकरणी एसआयटीने केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनूसह 14 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
Lakhimpur Case: लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra Teni) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) मंगळवारी दुपारी तुरुंगातून बाहेर आला. उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी त्यांची सुटका करण्याचे आदेश मंगळवारी सकाळी कारागृहाला दिले. त्यानंतर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून आशिषला सोडून देण्यात आले. आशिष 128 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे. आशिषला मुख्य गेटऐवजी मागच्या दाराने बाहेर काढण्यात आले. यामागे सुरक्षेचे कारण सांगण्यात आले. यादरम्यान मीडियानेही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र तो गाडीतून निघून गेला. तत्पूर्वी, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवारी जिल्हा न्यायालयात जामिनाचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश मुकेश मिश्रा यांनी संबंधित एसएचओ आणि तहसीलदार यांना दोन जामीनदार आणि त्यांच्या जामीनात ठेवलेल्या मालमत्तेची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते.
भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितले की, संयुक्त किसान मोर्चा आशिष मिश्रा यांच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. मंगळवारी लखीमपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना टिकैत म्हणाले की, शेतकऱ्यांना वाहनाने चिरडणारा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अवघ्या तीन महिन्यांत जामीन मिळाला आहे. ते म्हणाले की, तिकोनिया हिंसाचार प्रकरणात केंद्र सरकारने गृहराज्यमंत्र्यांना त्यांच्या पदावरून हटवलेही नाही किंवा त्यांची या प्रकरणात चौकशीही झाली नाही. (वाचा - Fodder Scam: चारा घोटाळा प्रकरणी Lalu Prasad Yadav यांच्यासह 75 जण दोषी, CBI कोर्टाने दिला मोठा निर्णय)
तिकोनिया येथे चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा झाला होता मृत्यू -
3 ऑक्टोबर रोजी झालेल्या तिकोनिया घटनेत चार शेतकरी, एक पत्रकार, एक चालक आणि दोन भाजप कार्यकर्ते ठार झाले होते. एका पत्रकाराच्या मृत्यूप्रकरणी एसआयटीने केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनूसह 14 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात सुरू आहे. याप्रकरणी आशिष मिश्रा हा 10 ऑक्टोबरपासून जिल्हा कारागृहात बंद होता.
जिल्हा न्यायाधीशांनी जामीन अर्ज फेटाळला -
जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर लखनौ उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने 10 फेब्रुवारी रोजी जामीन अर्ज मंजूर करून जामीन आदेश जारी केला. सोमवारी जिल्हा न्यायाधीश न्यायालयात जामिनाची रक्कम निश्चित करण्यासाठी अर्ज केल्याचे जिल्हा सरकारी वकिलांनी सांगितले. त्यावर जिल्हा न्यायाधीशांनी प्रत्येकी तीन लाख रुपयांचे दोन जामीन आणि त्याच रकमेचे वैयक्तिक बाँड आणि हमीपत्र दाखल करण्याचे आदेश दिले.
आशिष मिश्रा 128 दिवस तुरुंगात -
आशिष मिश्रा हा 128 दिवस जिल्हा कारागृहात होता. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आशिष मिश्रा हे 9 ऑक्टोबरला सकाळी एसआयटीसमोर निवेदन देण्यासाठी आले होते. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर एसआयटीने आशिषला अटक केली. रिमांड मॅजिस्ट्रेटसमोर हजर केल्यानंतर रात्रीच त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. 3 जानेवारी रोजी, SIT ने सखोल तपास केल्यानंतर, CJM कोर्टात मंत्र्यांचा मुलगा आशिषसह 14 आरोपींविरुद्ध सुमारे पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)