Asaduddin Owaisi Vehicle Attacked: असदुद्दीन ओवेसींचा संसदेत हल्लाबोल, Z कैटेगरी सुरक्षा घेण्यास दिला नकार
मला Z श्रेणीची सुरक्षा नको आहे, मी ती नाकारली. मला 'अ' वर्गाचा नागरिक बनवा मी गप्प बसणार नाही. कृपया न्याय करा.
असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्र सरकारने (Central Govt) दिलेली Z कैटेगरी सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे. खरेतर, असदुद्दीन ओवेसी यांच्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शुक्रवारी हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) कमांडोकडून 'Z' श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता ओवेसींनी हे संरक्षण नाकारले आहे. एक दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये ओवेसींच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. मेरठहून दिल्लीला परतत असताना असदुद्दीन ओवेसी यांनी झालेल्या हल्ल्याबाबत सांगितले की, मला मृत्यूची भीती वाटत नाही. मला Z श्रेणीची सुरक्षा नको आहे, मी ती नाकारली. मला 'अ' वर्गाचा नागरिक बनवा मी गप्प बसणार नाही. कृपया न्याय करा.
Tweet
सरकारच्या निर्णयानुसार Z कैटेगरी ओवेसींच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ कमांडो 24 तास तैनात असतील. (AIMIM) प्रमुखाला Z कैटेगरी सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय हापूरमध्ये त्याच्या कारवर कथित गोळीबार झाल्याच्या एका दिवसानंतर आला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांना उपस्थित राहून ओवेसी गुरुवारी संध्याकाळी दिल्लीला परतत होते. उत्तर प्रदेशात आठवडाभरानंतर विधानसभा निवडणुकीला सुरुवात होत आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे ओवेसी यांनी सांगितले. (हे ही वाचा PM Modi To Inaugrate Ramanujacharya Statue: पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारीला समाजसुधारक रामानुजाचार्यांच्या पुतळ्याचे करणार अनावरण)
दोन्ही आरोपींना 14 दिवसांची सुनावली न्यायालयीन कोठडी
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती हापूरचे एसपी दीपक भुकर यांनी दिली. गुरुवारी या दोघांनी ओवेसींच्या गाडीवर गोळीबार केला होता. या दोघांना गुरुवारीच यूपी पोलिसांनी अटक केली.