Gurugram Police: आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असताना 'त्या' तरुणीवर लैंगिक अत्याचार झालाच नाही; गुरुग्राम पोलिसांची माहिती
संबंधित तरूणीची वडिल तिला भेटायला गेले असातना तिने बलात्कार झाल्याचा प्रसंग एका कागदावर लिहून दिले होता.
दिल्लीच्या गुरुग्राम (Gurugram) येथील एका खाजगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल असलेल्या एका तरूणीवर बलात्कार झाल्याची महिती समोर आली होती. संबंधित तरूणीची वडिल तिला भेटायला गेले असातना तिने बलात्कार झाल्याचा प्रसंग एका कागदावर लिहून दिले होता. मात्र, या तरूणीवर लैंगिक अत्याचार न झाल्याचे पोलीस चौकशीतून स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह तेथील कर्मचाऱ्यांची देखील चौकशी केली आहे. त्यानंतर ही माहिती देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षयरोगग्रस्त 21 वर्षीय तरुणी गुडगाव येथील एका रुग्णालयात आयसीयूमध्ये भर्ती असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता. सहा दिवसानंतर शुद्धीवर आल्यानंतर संबंधित तरुणीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे आपल्या वडिलांना सांगितले. 21 ऑक्टोबर रोजी या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, प्रकृती खालावल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. हे देखील वाचा- Uttar Pradesh Crime: पती तुरुंगात गेल्यानंतर पत्नीचे दीरासोबत जुळले प्रेमसंबंध; 3 वर्षाने जामिनावर सुटून आल्यानंतर मोठ्या भावाची केली हत्या
एएनआयचे ट्विट-
पीडित तरुणीच्या वडिलांनी सांगितले की, 21 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. पीडिताच्या कुटुंबीयांनी तिचा मेडिकल चेकअप एका सरकारी रुग्णालयात करण्याची विनंती केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस पीडित तरुणीचा जबाब नोंदवण्यासाठी गेले होते. त्यावेळी डॉक्टरांनी तिची प्रकृती नाजूक असल्यामुळे तिच्याशी बोलता नाही, असे पोलिसांना सांगितले होते.