Uttar Pradesh Bride Refuses to Marry: कूलरजवळ बसण्यावरून वाद, भरमंडपात लग्न करण्यास वधूने दिला नकार; नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल
लग्नमंडपात आलेल्या पाहुण्यामंडळींचे कुलरवरून भांडण झाल्याने नववधूने चक्क लग्न मोडून काढले आहे.
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बुलंदशहरामध्ये एका लग्नमंडपात धक्कादायक घटना घडली आहे. लग्नमंडपात आलेल्या पाहुण्यामंडळींचे कुलरवरून भांडण झाल्याने नववधूने चक्क लग्न मोडून काढले आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. दोन्ही पक्षात वाद वाढत गेल्याने नववधूने लग्न करण्यास नकार दिला. हे प्रकरणा गावच्या पंचायतीकडे देखील नेण्यात आणि रात्री उशिरा पर्यत ही बैठक सुरु ठेवण्यात आले. (हेही वाचा- खुजली गँगमधील दोन जणांना अटक, दिल्ली पोलिसांनी सापळा रचून केली अटक (Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, चितबरागाव येथे ही घटना घडली. दोन्ही पक्षांनी पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी देखील अनेक प्रयत्न केले परंतु यावर तोडगा काढू शकले नाही. परिसरात शांतता भंग केल्याबद्दल १५१ रुपयांचा दंड ठोठावला.
मुस्तफाबाद येथील हुकुमचंद जैस्वाल नावाच्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या माध्यमातून घटनेची माहिती दिली. त्याने सांगितले की, वधूने ने लग्न मोडले. एका क्षुल्लक कारणामुळे वाद झाला होता. तीला लग्न करण्याची विनंती केली. तीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तीने एक ऐकले नाही. त्याने पुढे सांगितले की, लग्नाचा सोहळा पार पडणार होता तेवढ्यात कूलरजवळ बसण्यावरून वाद झाला. लग्नात भांडण झाले. ते शुभ नाही आणि ती तिच्या सासरी गेल्यावर काय होईल? असा प्रश्न वधूने उपस्थित केला होता.