Viral Video: संतप्त चालकाने भररस्त्यात पेटवला स्वत:चा टेम्पो, गुन्हा दाखल

ही घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहमध्ये घडली.

Tempo fire Photo twitter

Viral Video: नो पार्किंग झोनमध्ये पार्किंग केल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावल्यानंतर संतप्त झालेल्या एका टेम्पो चालकाने स्वत:चा टेम्पो पेटवला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहमध्ये घडली. भररस्त्यात चालकाने टेम्पो पेटवला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टेम्पो चालकाचे पोलिसांशी वाद झाला. त्यानंतर त्याने हे कृत्य केले. (हेही वाचा- आंध्र प्रदेशातील मुलींच्या वसतिगृहात अन्नातून विषबाधा झाल्याने मुलांची प्रकृती खालावली, तिघांचा मृत्यू, 37 जण रुग्णालयात दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरने या वर्षी मार्चमध्ये नवीन टेम्पो खरेदी केला होता. टेम्पो चालकाने नो पार्किंग झोनमध्ये पार्किंग केली. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी या प्रकरणी टेम्पो चालकावर दंड ठोठावला. दंडाला नकार देत असताना पोलिसासोबत चालकाची बाचाबाची झाली. संतप्त चालकाने टेम्पोला आग लावली. आग लागल्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन दलाने तातडीन घटनास्थळी धाव घेतली.

अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. एकाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी चालकावर जाळपोळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.  रक्षाबंधन निमित्त ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.