Andhra Pradesh: डॉक्टरांनी रस्त्यात सीपीआर देऊन 6 वर्षांच्या चिमुकल्याचा वाचवला जीव (Watch Video)
डॉक्टरांनी रस्त्यावरच त्याच्यावर ताबडतोब कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) केले.
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशमध्ये एका डॉक्टरने सहा वर्षांच्या मुलाला रस्त्यावरच सीपीआर(CPR) देऊन बचावल्याची घटना समोर आली आहे. मुलगा बेशुद्ध झाल्यानंतर त्याचा जीव वाचवण्यासाठी महिला डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना ५ मे रोजी आंध्र प्रदेश मधील विजयवाडा (Vijaywada) येथे घडली आहे. मात्र, त्याचा व्हिडीओ आत्ता समोर आला आहे. विजेचा धक्का लागल्याने मुलगा बेशुद्ध पडला होता. मुलाला असे पडलेले पाहून पालक घाबरले होते. ते मुलाला घेऊन डॉक्टरांकडे जात असतना ही सर्व घटना तिथे असलेल्या महिला डॉक्टरच्या लक्षात आली आणि त्यांनी रस्त्यावरच त्यांना थांबवून त्याच्यावर ताबडतोब उपचार सुरू केले. कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) त्याच्यावर केले. (हेही वाचा:Desi Jugaad Viral Video: कडक उन्हात पाणी थंड करण्यासाठी महिलेने केला देसी जुगाड, व्हिडीओ पाहून व्हाल चकित)
मुलावर सीपीआर करत असलेल्या डॉक्टरचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या घटनेवळी महिला डॉक्टरांनी तेथून जाणाऱ्या वडीलांनी आणि मुलाला पाहिले. त्यानंतर त्यांनी मुलाला तपासण्यासाठी त्यांनी ताबडतोब थांबले. मुलाच्या प्रकृतीची आणि त्यावरील उपचाराची गरज लक्षात घेऊन त्यांनी उपचार केले. ज्यात डॉक्टरांना मुलगा श्वासोच्छ्वास करत नसल्याचे आढळले. डॉक्टरांनी लगेच सीपीआर दिला. पाच मिनिटांनंतर मुलाला शुद्ध आली. त्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. 24 तासांच्या निरीक्षणानंतर मुलाला डिश्चार्ज देण्यात आला.