Amul Milk Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा झटका! अमूलचे दूध पुन्हा महागले; लिटरमागे 2 रुपयांची वाढ
त्यामुळे अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ केली आहे.
Amul Milk Price Hike: गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) शनिवारी राज्यात अमूल दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ (Amul Milk Price Hike) केली. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. चारा आणि वाहतूक खर्च वाढल्याने दुधाच्या दरात वाढ झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ केली आहे.
किमतीत सुधारणा केल्यानंतर, अमूल म्हशीच्या दुधाची किंमत आता 68 रुपये प्रति लीटर झाली आहे, तर अमूल गोल्डची किंमत 64 रुपये झाली आहे. याशिवाय अमूल शक्तीची किंमत 58 रुपये प्रति लीटर झाली आहे. तसेच, अमूल गायीच्या दुधाची किंमत आता 54 रुपये प्रति लिटर, अमूल ताझा 52 रुपये प्रति लिटर आणि अमूल टी-स्पेशल 60 रुपये प्रति लीटर झाली आहे. (हेही वाचा - Full Emergency At Delhi Airport: दिल्ली विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित; FedEx विमान पक्ष्याला धडकल्यानंतर घेण्यात आला निर्णय)
गुजरातमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून दुधाच्या दरात वाढ झालेली नाही. अमूलने ऑक्टोबर 2022 मध्ये प्रति लिटर 2 रुपये आणि फेब्रुवारी 2023 मध्ये पुन्हा 3 रुपये प्रति लिटरने गुजरात वगळता राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी दर वाढवले होते.
दूध दरवाढीबाबत महासंघाने सांगितले की, पशुखाद्य आणि इंधनाच्या किमतीत वाढ झाल्याने दुधाचे दर वाढवण्यात आले आहेत. अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अहमदाबाद, गांधीनगर, भरूचमध्ये दर वाढले आहेत. सौराष्ट्र, कच्छ, उत्तर गुजरात, खेडा-आणंद, नर्मदा यासह संपूर्ण राज्यात हे दर लागू झाले आहेत. यासोबतच ही दरवाढ आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे.