IPL Auction 2025 Live

Hotel Radisson Blu: हॉटेल रॅडिसन ब्लूचे मालक अमित जैन यांची आत्महत्या; पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

Hotel Radisson Blu: हॉटेल रेडियंस ब्लूचे (Hotel Radisson Blu) मालक अमित जैन (Amit Jain) हे त्यांच्याच घरात लटकलेल्या अवस्थेत सापडले. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची भीती व्यक्त होत आहे. शनिवारी ते त्याच्या दिल्लीतील फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गाझियाबादमधील कौशांबी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलचे मालक अमित जैन शनिवारी त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आले. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास खेळगाव येथील एका फ्लॅटमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता अमित जैन यांचा मृतदेह फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. (हेही वाचा - Rajasthan: दिल्ली-स्टाईल मर्डर; लेस्बियन पत्नीने पतीची हत्या करून शवाचे तुकडे गटारात फेकले, हादरला होता देश)

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, "चौकशीदरम्यान असे समजले की अमित जैन नोएडा येथील त्याच्या नवीन घरातून सकाळी नाश्ता करून CWG व्हिलेजमधील त्याच्या घरी आले होते. जेव्हा त्याचा मुलगा CWG मध्ये नंतर सामान गोळा करण्यासाठी ड्रायव्हरसोबत घरी पोहोचला. त्यांनी जैन यांना लटकलेल्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर जैन यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

याप्रकरणी अद्याप पोलिसांकडे तक्रार आलेली नाही. त्यामुळे ही आत्महत्या असल्याचे मानले जात आहे. अमित जैन यांनी आत्महत्या का केली? याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यांच्यावर खूप कर्ज होते, त्यामुळे ते अस्वस्थ होते, असंही म्हटलं जात आहे. त्यामुळेचं त्यांनी आत्महत्या केली असावी. याप्रकरणी पोलीस कुटुंबीय आणि नातेवाईकांचीही चौकशी करत आहेत.