अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गुजरात मध्ये तीन तासांचा दौरा, स्वागतासाठी प्रशासनाला 100 कोटींचा खर्च

त्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत असून त्यांच्या स्वागातासाठी कोणतीच कमतरता राहू नये याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. गुजरात मधील अहमदाबाद (Ahmadabad) येथे डोनाल्ड ट्रम्प फक्त तीन तासांचा दौरा करणार आहेत.

PM मोदी आणि राष्ट्रपति डोनल्ड ट्रंप (File Photo)

अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम (Donald Trump) हे येत्या 24-25 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत असून त्यांच्या स्वागातासाठी कोणतीच कमतरता राहू नये याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. गुजरात मधील अहमदाबाद (Ahmadabad) येथे डोनाल्ड ट्रम्प फक्त तीन तासांचा दौरा करणार आहेत. परंतु प्रशासनाला त्यांच्या या दौऱ्यानिमित्त स्वागतासाठी होणारा खर्च अधिक महागात पडत आहे. 24 फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार आल्यानंतर पहिल्या दिवशी गुजरात मधील अहमदाबाद येथे दौरा करणार आहेत.

अहमदाबाद येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. तर नगर निगम आणि शहरी विकास प्राधिकरणाने रस्ते सुंदर बनवण्यासाठी जवळजवळ शंभर कोटी रुपये खर्च केले आहेत. मोटेरा स्टेडिएम येथून परतण्यासाठी विमानतळापर्यंत बनवण्यात येणाऱ्या 1.5 किमी लांब रस्त्यासाठी 60 कोटी रुपयांचा खर्च प्रशासनाकडून करण्यात आला आहे. या मार्गाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी 8 कोटी रुपयांचे बजेट ठरवण्यात आले आहे.(डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मार्क जुकरबर्ग याने फेसबुकवर मला क्रमांक 1 आणि पंतप्रधान मोदींना क्रमांक 2 म्हटले, हा माझ्यासाठी हा मोठा सन्मान')

टाईम्स ऑफ इंडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दौऱ्यासाठी कमीतकमी 100 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. म्हणजेच एका मिनिटासाठी 55 रुपयांचा खर्च केला जाणार आहे. तर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान कोणतीही कमतरता भासू नये असे स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांच्या तीन तासांच्या अहमदाबाद दौऱ्यासाठी केंद्र सरकार खर्च उचलण्यास तयार आहे, पण तरीही राज्य सरकारला त्यापेक्षा अधिक खर्च करावा लागणार आहे.

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान गुजरात मधील अहमदाबाद येथे 'केम छो, मिस्टर प्रेसिडंट?'(Kem chho, Mr President?) नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यासाठी गेले असताना 'हाऊडी मोदी' (Howdy Modi) हा कार्यक्रम आयोजित करून त्यांचे स्वागत करण्यात आले होते, त्याचप्रकारे ट्रम्प त्यांच्या स्वागतासाठी भारतात हा केम छो प्रेसिडेंट कार्यक्रम होणार आहे.