एअर इंडिया पायलट Captain Zoya Agarwal यांची संयुक्त राष्ट्र संघाची महिला प्रवक्ता म्हणून निवड
एअर इंडियाचे (Air India) पायलट कॅप्टन झोया अग्रवाल (Zoya Agarwal) यांची संयुक्त राष्ट्र संघात महिला प्रवक्ता म्हणून नियुक्ती (Generation Equality) होणे हा भारतासाठी सन्मानाची गोष्टी आहे.
एअर इंडियाचे (Air India) पायलट कॅप्टन झोया अग्रवाल (Zoya Agarwal) यांची संयुक्त राष्ट्र संघात महिला प्रवक्ता म्हणून नियुक्ती (Generation Equality) होणे हा भारतासाठी सन्मानाची गोष्टी आहे. कॅप्टन झोया यांना जनरेशन इक्वॅलिटी अंतर्गत ही जबाबदारी देण्यात आली आहे. "मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, मला माझ्या देशाचे आणि एअर इंडियाचे ध्वजवाहक यूएन महिला सारख्या व्यासपीठावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, जी माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. जगभरात माझ्या देशाचे नाव मोठे करण्यासाठी मिळालेल्या संधीचा मला खूप सन्मान वाटतो" असे कॅप्टन झोया यांनी एएनआयशी बोलताना म्हटले आहे.
कॅप्टन झोयाच्या म्हणण्यानुसार, त्या 8 वर्षांची होत्या जेव्हा त्यांनी आकाशात उडण्याचे स्वप्न पाहिले. आजूबाजूच्या वातावरणाची काळजी न करता ती पुढे गेल्या आणि आपले स्वप्न साकार केले. कॅप्टन झोया प्रत्येक मुलीला आणि स्त्रीला आवाहन करतात की, इतर महिलांनीही आपल्या सभोवतालच्या वातावरणाची काळजी करू नये. प्रत्येक मुलीने केवळ स्वप्न पाहू नये तर, ती पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजेत. हे देखील वाचा-Independence Day 2021: भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सेलिब्रेशन साठी 360-degree VR चं फीचर सह indianidc2021.mod.gov.in नवी वेबसाईट लॉन्च
झोया यांनी यावर्षीच्या सुरुवातीला जगातील सर्वात लांब हवाई मर्गावरील उत्तर धुव्रावर उड्डाण करून इतिहास रचला होता. त्यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिक्सो येथून उड्डाण घेऊन उत्तर धुव्रमार्गे बेंगलोर येथे केन्पगौडा आतराष्ट्रीय विमानतळावर पोहचल्या होत्या. त्यांनी या प्रवासादरम्यान सुमारे 14 हजार किमीचे अंतर पार केले होते. या संपूर्ण मार्गावर केवळ झोया यांच्यासह चार महिला वैमानिकांनी सारथ्य करीत 'एआय-176' विमान सुखरुपपणे भारताच्या भूमीपर्यंत आणले होते.