एअर इंडिया SITA Server कार्यान्वित, विमानोड्डान सुरु झाल्याने जगभरातील प्रवाशांकडून सुटकेचा निश्वास
तेव्हापासून पुढचे अनेक तास हा सर्व्हर बंदच होता. त्यामुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीवर परिणाम झाला. त्याचा फटका प्रवाशांना बसला. त्यामुळे राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ((Indira Gandhi International Airport)) आणि मुंबई (Mumbai) विमानतळावर प्रवाशांचे लोढेच्या लोंढे पाहायला मिळाले.
जगभरातील विमान प्रवाशांच्या खोळंब्याचे कारण ठरलेला एअर इंडिया (Air India) या सरकारी विमान कंपनीचा SITA Server अखेर पुन्हा एकदा कार्यन्वित झाला. सर्व्हर कार्यन्वित झाल्यामुळे विमान सेवा पूर्ववत सुरु झाली आणि विमानतळावर खोळंबलेल्या प्रवाशांनी एकदाचा सुटकेचा निश्वास सोडला. प्राप्त माहितीनुसार पहाटे 3.30 वाजनेच्या सुमारास सर्व्हर डाऊन झाला. तेव्हापासून पुढचे अनेक तास हा सर्व्हर बंदच होता. त्यामुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीवर परिणाम झाला. त्याचा फटका प्रवाशांना बसला. त्यामुळे राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Indira Gandhi International Airport) आणि मुंबई (Mumbai) विमानतळावर प्रवाशांचे लोढेच्या लोंढे पाहायला मिळाले.
प्रवाशांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, काही प्रवासी तर गेले 3 ते पाच तासांहून अधिक काळ मुंबई विमातळावर अडकले होते. विमानसेवा सुरु झाल्यानंतर या प्रवाशांचा प्रवास सुरु झाला आहे. या प्रवाशांनी आरोप केला आहे की, एअर इंडिया कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना योग्य ती माहिती समाधानकारकपणे मिळत नाही.
एएनआय ट्विट
मुंबई विमानतळावर अडकलेल्या एका प्रवाशाने ट्विट केले आहे की, विमानतळावर कमीत कमी 2 हजार प्रवासी अडकले आहेत. संपूर्ण भारतात एअर इंडियाचे SITA डाऊन झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्वर डाऊन झाल्यामुळे प्रवाशांना बोर्डींग पासही काढणे कठीण बनले आहे. त्यामुळे काही प्रवाशांनी मुंबई विमानतळावर जोरदार आक्षेप नोंदवला. (हेही वाचा,एअर इंडिया: Air India SITA Server डाऊन, दिल्ली, मुंबई विमानतळावर प्रवासी अडकले )
एएनआय ट्विट
प्राप्त माहितीनुसार सर्वर पहाटे 4 वाजलेपासून डाऊन आहे. त्यामुळे अनेक विमानांच्या उड्डाणांवर त्याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, एक तासाभरात मार्ग काढून सेवा पूर्ववत होइल असे एअर इंडियाने म्हटले आहे. SITA-DCS ब्रेकडाऊन झाल्याने सेवेत अडथळा येत आहे. आमचा तंत्रज्ञान विभाग काम करत असून लवकरच सेवा पूर्ववत होईल असे एअर इंडियाने म्हटले आहे. तसेच, प्रवाशांच्या गौरसोईबद्दल दिलगिरीही व्यक्त केली होती.