IMD Weather Update : 'या' राज्यात पुढील ३ तीन पावसाची शक्यता,दिल्लीत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, IMD ने वर्तवला अंदाज

त्यामुळं सामान्यांसह बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. जाणून घ्या दिल्ली असं असे वातावरण

Rain | representative pic- (photo credit -pixabay)

IMD Weather Update : गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा आगमन केलं. देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. दिल्लीत शनिवारपासून हलक्या स्वरुपात पाऊस सुरु आहे. नागरिकांना उष्णेतापासून सुटका मिळाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येते  ४ ते ५ दिवसांत उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, झारखंडसह इतर राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पावसाने चांगलीच बॅंटींग केली आहे.  महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमधील काही जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. मिझोराम, नागालँड आणि मणिपूरमध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. मध्य प्रदेशातही मुसळधार पाऊस असणार आहे असं शक्यता वर्तवली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेत भारतीय हवामान विभागाने नागरिकांना घरीच थांबण्याचा सल्ला दिला आहे

दिल्लीत शनिवार पासून मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. रविवारी देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज दिल्लीत हलक्या पावसासह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस रिमझिम पाऊस असेल असा अंदाज वर्तवला आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात येत्या तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडेल. IMD ने महाराष्ट्रात दोन दिवसांचा यलो अर्लट जारी केला आहे.