Agra Shocker: सहा वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या, आरोपीला अटक, आग्रा येथील धक्कादायक घटना

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे सहा वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Agra Shocker:  उत्तर प्रदेशातील आग्रा येथे सहा वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर आग्रा शहर संपुर्ण हादरलं आहे. मृत मुलगी आणि आरोपी हे एकाच गावातील रहिवासी होते. मुलीची बलात्कारानंतर डोकं दगडाने ठेचले त्यानंतर तीला पाण्याच्या टाकीचे टाकून दिले दरम्यान बुडून मृत्यू झाला. आरोपी गावात एका शेतीचे रक्षण करण्याचे काम करायचा अशी माहिती पोलिासंनी दिली. (हेही वाचा- सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपी फरार, पैठण येथील खळबळजनक घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत मुलगी हे एकाच गावातील रहिवासी असल्याने एकमेकांच्या ओळखीचे होते. राजविर सिंग असं आरोपीचे नाव आहे. घरात मुलगी सापडत नसल्याने मुलीचा शोध घेण्यास सुरु केला होता त्यावेळी राजविरने देखील मुलीचा शोध घेण्यास कुटुंबाची मदत केली होती.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी गांभिर्य दाखवून घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मुलीला शोधण्यासाठी कुत्रा आणला होता त्यावेळी तो दोन ते तीन वेळा राजविरवर भुंकला होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला.  दरम्यान पाण्याच्या टाकीजवळ कचऱ्याच्या ढीगाऱ्यात मुलीचा मृतदेह सापडला.

पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तीचा बलात्कार झाल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतक दगडाने ठेचून आणि पाण्यात बुडवून हत्या करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीला ताब्यात घेत त्याची चौकशी केली परंतु सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने बलात्कार आणि खूनाची कबुली दिली. त्यानंतर मुलीची वडिलांना राजविरविरुध्दात तक्रार दाखल केली. आग्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे.